एकेकाळी ‘लाल’ दिव्याच्या गाडीत फिरणारी ‘ही’ महिला आज ‘शेळी’ पालन करते, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – वेळ खूप ताकदवर असते. अनेकांना गादीवर देखील ती बसवते आणि गादी काढून घेण्याची क्षमता देखील वेळेमध्ये असते. अशाचप्रकारची एक घटना मध्यप्रदेशातील महिलेबरोबर घडली असून शिवपुरी जिल्ह्यातील हि आदिवासी महिला आहे,जी एकेकाळी लाल बत्तीच्या गाडीमधून फिरत असे.

वेळ कुणासाठीही बसून राहत नाही याचे जिवंत उदाहरण हि महिला असून जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष आहे. एकेकाळी अधिकारी तिच्यामागे फिरत असतं. मात्र आज तिला आपले पोट भरण्यासाठी बकरीपालन करावे लागत आहे. त्याचबरोबर तिच्याजवळ स्वतःचे घर देखील नसून एका टपरीमध्ये ती आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहे. जुली असे या आदिवासी महिलेचे नाव असून तिला दोन मुली आणि तीन मुले आहेत. ज्यावेळी ती जिल्हा पंचायतीची अध्यक्ष झाली त्यावेळी तिच्या मुलांचे खासगी शाळेत ऍडमिशन करण्यात आले.

मात्र आज तीच मुले मजदुरी करत आहेत. ती शेळीपालन करून आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहे. 2005 मध्ये तिला माजी आमदार रामसिंह यादव यांनी जिल्हा पंचायत सदस्य बनवले त्यानंतर दुसरे माजी आमदार वीरेन्द्र रघुवंशी यांनी तिला पंचायत समितीचे अध्यक्ष देखील बनवले.दरम्यान, तिच्याकडे सध्या 50 हुन अधिक बकऱ्या असून प्रत्येक बकरीमागे तिला महिन्याला 50 रुपये मिळतात. याच आधारे सध्या तिचा उदरनिर्वाह सुरु आहे.

Visit : Policenama.com