गणवेशात असताना टिळा, गंडे, दोरे नकोत; पोलिस आयुक्तांच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘मुंबई पोलिस दलाचे नाव आदराने घेतले जाते. ही प्रतिमा कायम जपण्यासाठी स्वच्छ खाकी वर्दी परिधान करा’, अशा स्पष्ट सूचना मुंबईचे नवे पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच बुटापासून टोपीपर्यंत वर्दी कशी परिधान करावी, याच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे गणवेश घालून कामावर असताना टिळा, गंड दोरे बांधू नयेत, असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.

[amazon_link asins=’B01EU2M62S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5eff2b14-829c-11e8-88f6-6342d49f3669′]
भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’मध्ये कामाचा अनुभव असलेले शिस्तप्रिय सुबोध जयस्वाल यांनी मुंबई पोलिस दलाला शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात त्यांनी खाकी वर्दीपासून केली आहे. आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून आठ दिवसांतच त्यांना अधिकारी आणि अंमलदार व्यवस्थित गणवेश परिधान करीत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘गणवेश स्वच्छ, नीटनेटका व इस्त्री केलेला असावा आणि कुठेही शिलाई उसवलेली नसावी, असे त्यांनी जारी केलेल्या विशेष सूचनांमध्ये नमूद केले आहे. वर्दीवर असताना कपाळावर टिळा लावणे टाळावे, गळ्यात, मनगटावर गंडा-दोरा बांधू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6bc5bcdc-829c-11e8-a5f5-158e8e1ff0cc’]
बुटापासून टोपीपर्यंत वर्दी कशी परिधान करावी, याच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी जारी केल्या असून, प्रत्येक पोलिस ठाण्यात त्या दर्शनी भागांत लावाव्यात, असेही म्हटले आहे. वर्दीवरील नावाची पाटी, केसाची रचना, मेडल, स्टार इतकेच नाही तर पट्टा, मोजे कोणत्या रंगाचे आणि कसे वापरावेत हेही सुबोध जयस्वाल यांनी आपल्या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद केले आहे.