Tim Southee | न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड; 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

कानपुर : वृत्तसंस्था – टीम साऊदीच्या (Tim Southee) भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम साऊदीने अचूक मारा करत पहिल्या सत्रात 4 विकेट्स घेतल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. कानपूरमध्ये 42 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) 5 विकेट घेतल्या आहेत.

 

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 258 रन्सवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या तिसऱ्या षटकात टीम साऊदीने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) बोल्ड करत संघाला पहिले यश मिळवून दिले. जडेजाला आज एकही रन करता आली नाही. यानंतर साऊदीने ठराविक फरकाच्या अंतराने टीम इंडियाला धक्का देत टीम इंडियाचा संपूर्ण डाव ३४५ वर समाप्त झाला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरने 171 चेंडूत 105 धावा केल्या आहेत.

 

कानपूरमध्ये (Kanpur) 1979 नंतर किवींकडून परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) एका डावात 5 बळी घेतले.
यापूर्वी 1979 मध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) सिकंदर बख्त (Sikander Bakht) आणि एहतेसामुद्दीन (Ehtesamuddin) यांनी ही कामगिरी केली होती.
टीम साऊदीशिवाय काईल जेमिसनलासुद्धा (Kyle Jamieson) 3 विकेट घेण्यात यश आले आहे.
न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाना अजून प्रभावीपणे गोलंदाजी करता आलेली नाही.

 

Web Title :- Tim Southee | kanpur test southee picks 5 wickets after shreyas iyer s debut test ton india 338 8 at lunch on day 2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा