पुन्हा ‘रेट्रो’ युगात घेऊन जाणार बप्पी लहरी, ‘कामयाब’चं नवीन गाणं ‘टिम टिम टिम’ रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार संजय मिश्रा स्टारर ‘कामयाब’ सिनेमातील नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. टिम टिम टिम असं या गाण्याचं नाव आहे. हे एक रेट्रो साँग आहे. बॉलिवूडमधील रेट्रो कलाकारांना हे गाणं डेडीकेट करण्यात आलं आहे. दिग्गज प्लेबॅक सिंगर बप्पी लहरीनं हे गाणं गायलं आहे.नीरज पांडेनं  हे गाणं लिहिलं आहे. युट्युवबवरून हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. चाहत्यांकडून हे गाणं वारंवार पाहिलं जाताना दिसत आहे.

बॉलिवूडचा डिस्को किंग म्हणवल्या जाणाऱ्या बप्पी लहरीच्या आवाजानं गाण्यात पुन्हा एकदा ती जुनी जादू दिसत आहे. हे गाणं तुम्हाला पुन्हा एकदा जुन्या जमान्यात घेऊन जातं यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर खूपच फनी असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. अनेक चाहत्यांनी ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

सिनेमाची स्टार कास्ट
सिनेमाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, सारीका सिंह आणि ईशा तलवार यांसारखे दिग्गज कलाकार काम करताना दिसणार आहेत. हार्दिक मेहतानं सिनेमाची स्टोरी लिहिली आहे. त्यानंच हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. या सिनेमाची निर्मिती गौरी खान, मनीष मुंद्रा, गौरव वर्मा यांनी केली आहे. हार्दिक मेहता आणि राधिका आनंदनं सिनेमाचे डायलॉग्स लिहिले आहेत.