देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शायरीचे थेट HM अमित शहांशी ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल रविवारच्या दिवशी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मी पुन्हा येईल असं म्हणणाऱ्यांनी टाईमटेबल सांगितले नव्हते अशा प्रकारचा खोचक टोला लगावण्यात आला होता. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शायरीचा वापर केला मात्र हा शायरीचा थेट संबंध हा गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहे.

विरोधी पक्षनेता होताच देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी फडणवीस म्हणाले, मेरा पाणी उतरता देख किनारेपर घर मत बना लेना, मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा. . मी पुन्हा येईनच्या टोल्याला त्यांनी या शायरीत प्रतिउत्तर दिलं. विरोधी पक्षात राहणे हा आमचा डीएनए आहे, हिताचं काम करण्यासाठी नक्कीच मदत करू असेही फडणवीस म्हणाले. २०१० मध्ये ज्यावेळी अमीत शहा यांना अटक झाली होती त्यावेळी सुद्धा त्यांनी गुजरातच्या विधानसभेत हीच शायरी म्हंटली होती आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच शायरी म्हंटली आहे.

तीन महन्यांच्या कालावधीमध्ये अमित शहा हे जेलबाहेर आले होते. त्यावेळी काँग्रेसचे पी. चिदंबरम हे गृहमंत्री होते. अमित शहा ज्यावेळी देशाचे गृहमंत्री झाले त्यावेळी माजी गृहमंत्री झालेले पी चिदंबरम हे जेलमध्ये आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर ही नावे वंदनीय आहेतच परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या पद्धतीने शपथ घ्यायला सांगितले आहे त्याचे पालन व्हायला हवे होते असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तुम्ही कितीही चिडलात, रागावलात तरीही मी नियमाला धरूनच काम करत राहणार असे म्हणत फडणवीस यांनी भाजपवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

Visit : Policenama.com