MS धोनी बाबत सुनील गावस्करांनी केलं ‘हे’ मोठं विधान, म्हणाले….

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आता निवृत्त व्हावे असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे. धोनीचा टाइम आता संपला असून निवड समितीने त्याला पर्याय शोधायला हवेत. असं गावस्कर म्हणाले आहेत. वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतला धोनीचा पर्याय म्हणून सांगितले आहे.

धोनीच्या निवृत्तीविषयी बोलताना गावस्कर म्हणाले की, ‘धोनीच्या मनात काय आहे हे सध्यातरी कुणालाच माहीत नाही. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो. पण मला वाटतं आज तो 38 वर्षांचा आहे. भारतीय संघानं आता पुढचा विचार करायला हवा. कारण, पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत तो 39 वर्षांचा असेल. धोनी संघात असणं आजही फायदेशीर आहे हे खरं आहे. तो किती धावा करतो किंवा यष्टीमागे कशी कामगिरी करतो, यापेक्षा मैदानात त्याचं असणं हे संघाच्या कर्णधाराला धीर देणारं असतं. त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो. असं असलं तरी त्याच्या निवृत्तीची वेळ आली आहे. भारताला विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणाऱ्या धोनीनं सन्मानानं जायला हवं. ‘

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने संथ खेळ केला होता. यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली होती. धोनीने आता संन्यास घ्यायला हवा असा तेव्हापासून अनेकांनी सल्ला द्यायला सुरुवात केली होती. त्यात आता सुनील गावस्करांची भर पडली आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like