TIME च्या शतकातील 100 सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत इंदिरा गांधी आणि अमृत कौर यांच्या नावाचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाइम मॅगझिनने मागील शतकातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या महिलांमध्ये इंदिरा गांधी आणि स्वतंत्रता सेनानी अमृत कौर यांच्या नावाचा समावेश आहे. TIME ने 1947 साली कौर यांचे वूमन ऑफ द इयर आणि इंदिरा गांधी यांचे 1976 साली विशेष कवरच्या रुपात मॅगझिन प्रकाशित केले होते. टाइमच्या मते 1976 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या हुकूमशहाच्या रुपात ओळखल्या गेल्या होत्या.

इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतात आणीबाणी घोषित केली होती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची चर्चा झाली होती. टाइम मॅगझिनने स्पॉटलाइट्स इंफ्लूएशन वूमन हू वर ऑफ्टन ओवरशॅडो नावची एक यादी प्रकाशित केली होती. टाइमच्या मते याद्वारे 100 प्रभावशाली महिलांना समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. या अशा स्त्रीया आहेत ज्यांनी अशा पदांवर आधिकार गाजवला ज्या पदांवर शक्यतो पुरुषांची निवड होते होती.

टाइममध्ये कौर यांच्यासंबंधित सांगण्यात आले की 1918 मध्ये ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि महात्मा गांधींच्या शिक्षणाने त्या प्रेरित झाल्या होत्या, त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी, मतदान अधिकारासाठी, घटस्फोट आणि बाल विवाहाच्या विरोधात आवाज उठवला होता.

1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर कौर कॅबिनेट कमिटीत पहिल्या महिला म्हणून सहभागी झाल्या, ज्या 10 वर्ष आरोग्य मंत्री होत्या. त्यांनी भारतीय बाल कल्याण परिषदेची स्थापना केली. त्यांनी देशात अनेक रुग्णालय आणि कॉलेज स्थापन करण्यात मदत केली.

TIME प्रोफाइलमध्ये सांगण्यात आले की त्यांनी मलेरिया रोखण्यासाठी अभियान चालवले होते ज्यात हजारो लोकांचा जीव गेला होता. टाइमने त्यांना वूमन ऑफ द ईयर नाव दिले. या महिलांसाठी टाइमने 89 नवे TIME कवर तयार केले, ज्यात अनेक कलाकारांचे होते.