TIME मासिकाने शेतकरी चळवळीत सामील असलेल्या महिलांना कव्हर पेजवर दिली जागा, लिहिले – ‘मुझे डराया और खरीदा नहीं जा सकता’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याला देशभरातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. लाखोंच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले. ज्याचे देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही अनेकांनी समर्थन केले. अश्यातच या भारतीय कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांना ‘टाइम (TIME)’ मासिकाने आपले आंतरराष्ट्रीय कव्हर पेज डेडिकेट केले आहे.

टाईम मासिकाच्या नवीन आंतरराष्ट्रीय कव्हरवर एक टॅगलाइन देखील आहे, ज्यामध्ये लिहिले की, ‘मला घाबरवले किंवा धमकावले जाऊ शकत नाही आणि विकत देखील घेतले जाऊ शकत नाही. भारताच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला.’ मासिकाच्या कव्हर पेजवर शेतकरी चळवळीत सहभागी काही महिलांचा सरकारविरोधात घोषणाबाजी करतानाचा फोटो आहे, ज्यांच्यासोबत काही लहान मुलेदेखील दाखवली गेली आहेत.

टाईम मासिकाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे, “टाईमचे नवीन आंतरराष्ट्रीय कव्हर.” टाईम मासिकाच्या कव्हर पेजवरील महिलांमध्ये, 41 वर्षीय अमनदीप कौर, गुरराम कौर, सुरजित कौर, जसवंत कौर, सरजित कौर. दिलबीर कौर, बिंदू अम्मा, उर्मिला देवी, साहुमती पाढा, हीराथ झाड़े, सुदेश गोयत सहभागी आहेत. या महिला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. टाइम मासिकाने आपल्या लेखात लिहिले की, ‘ महिला शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कश्याप्रकारे पुढाकार घेतला आहे, तर सरकारने त्यांना घरी जाण्यास सांगितले आहे. तसेच, सरकारच्या म्हणण्यानंतरही या शेतकरी महिला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मोर्चा सांभाळत आहे.

दरम्यान, पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग सारख्या आंतरराष्ट्रीय आयकॉन आणि सेलिब्रिटींनी ट्विट केल्यांनतर, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाली. दरम्यान, त्यांनतर हे स्पष्ट झाले की, ग्रेटा थनबर्ग भारताविरूद्धच्या अपप्रचाराच्या कट रचनेचा एक भाग होती, ज्याचा अद्याप तपास सुरु आहे.