‘TIME’ मासिकाची ‘पलटी’ ; निवडणुकीतील भरघोष यशानंतर मोदींचे भरभरून ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा उल्लेख टाइम मासिकाकडून ‘भारताला तोडणारा प्रमुख’ असा करण्यात आला होता. मात्र निवडणूक झाल्यांनतर टाइम मासिकानं राजकारण्यांसाराखी पलटी मारली आहे. मोदींची स्तुती करणारा लेख टाइम मासिकाने प्रसिद्ध केला असून आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानास जमले नाही, अशाप्रकारे मोदींनी देशाला एकसंध बनवले आहे. असे त्यात लिहण्यात आले आहे. हा नवीन लेख मंगळवारी वेबसाइटवर प्रकाशित झाला आहे. मनोज लाडवा यांनी हा लेख लिहिला असून त्यांनी २०१४ पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी’ या मोहिमेचे व्यवस्थापन केले होते.

नवीन लेखातील मुद्दे
मोदींनी भारताची सर्वात मोठी कमजोरी असलेल्या घटकावर म्हणजेच समाजातील विविध वर्गांमधील भेदभावांवर मात केली आहे. या लेखात त्यांनी मोदींना या जातींचा उत्प्रेरक असे संबोधले आहे. मोदींच्या उदयाचे श्रेय त्यांच्या मागास जातीतील जन्मास आहे.

निवडणुकीपूर्वीच लेख
जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली होती. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला होता. त्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या कारभारावर टीका करताना मासिकानं नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली होती . हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केलं नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली होती.

https://npnews24.com/2019/05/29/time-magazine-in-about-face-now-says-modi-has-united-india/