वेळेची कमतरता जाणवणं हा मेंदूचा भ्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खूप कामं आहेत आणि वेळेची कमतरता आहे असं अनेकांना सतत वाटत राहतं. परंतु, याबाबतीत तज्ज्ञांचे मत आहे की, टाइम प्रेशर असं काही नसतंच. मुळात हा विचारच चुकीचा आहे. या समस्येबाबत अमेरिकेत एक सव्र्हे करण्यात आला. विशेष म्हणजे या सव्र्हेत सहभागी झालेल्या निम्म्या लोकांचं असं म्हणणं होतं की, त्यांना खूप कामं आहेत आणि त्यांच्याकडे वेळच नाही.

१९६५ ते २००३ सरासरी अमेरिकेत वर्कवीक तीन तासांचा आहे तर आराम करण्याचा वेळ वाढला आहे. जगातल्या अनेक ठिकाणांवर वर्कवीक लहान झाला आहे. असं असेल तर टाइम प्रेशर वाढला असं म्हणता येणार नाही. ग्रेटर गुड मॅगझिनमध्ये या समस्येबाबत जो मजकुर प्रसिद्ध झाल आहे त्यामध्ये म्हटले आहे की, वेळेची कमतरता जाणवणे हा केवळ मेंदूचा भ्रम आहे. दरवेळी वेळ नाही, असं म्हणत डोक्याला हात लावण्यापेक्षा थोडा वेळ काढून स्वताच्या सायकॉलॉजीवर केला पाहिजे. टाइम प्रेशर खरं आहे की भ्रम हे जाणून घेण्यासाठी आपण स्वत:लाच काही प्रश्न विचारू शकतो. आपण जे काम करतो ते आपण एन्जॉय करतो का? तुमचे उद्दीष्ट आणि काम तुमच्या डोक्यात योग्यप्रकारे आहेत का? जर नसतील तर मग सतत तुम्हाला काम पेंडिंग वाटतं का किंवा त्यासाठी तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करता का? जर असं असेल तर तुमच्या आवडीचं किंवा मजेदार काम सुद्धा टाइम प्रेशर जाणवेल. उदाहरणार्थ जर घरी जेवण करणे आणि ऑफिसमधील काम जर समान लेखले तर ताण जाणवतो.

तेच जर घरी जेवण करण्याची तुलना ऑफिसच्या कामासोबत केली नाही आणि याने तुमची प्रॉडक्टिविटी वाढण्यास मदत होईल असा विचार केला तर आपण कामाचा आनंदही घेऊ शकतो. तसेच तुम्हाला वाटतं का की, तुमचं जीवनावर नियंत्रण आहे? मुळात टाइम प्रेशर तेव्हा जाणवायला लागतं जेव्हा तुम्ही तुमचं नियंत्रण गमावू लागत असता. उदाहरण द्यायचं तर हे की, एखाद्या मिटींगला जाताना तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात. आणखी एक म्हणजे वेळेची तुम्ही किती किंमत करता? अनेक सव्र्हेंमधून समोर आलं आहे की, ज्या लोकांकडे जास्त पैसे असतात त्यांना जास्त टाइम प्रेशर जाणवतं. पण मूळ मुद्दा हा आहे की, टाइम प्रेशर हा केवळ तुमच्या डोक्याचा आणि मनाचा एक भ्रम, एक खेळ आहे.