टाइम्स समूहाच्या अध्यक्ष इंदू जैन यांचं 84 वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टाइम्स समूहाची मालकी असलेल्या बेनेट, कोलमन अँड कंपनीच्या अध्यक्ष इंदू जैन(वय ८४) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यांनी महिला अधिकाराच्या समर्थनार्थ कार्य केले होते. तसेच त्या दातृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन कलासक्त होत्या.

 

 

 

 

इंदू जैन यांनी पती अशोक जैन यांच्या निधनानंतर टाइम्स समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. सामाजिक विकास आणि परिवर्तनासाठी त्यांनी टाइम्स फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली होती. महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. फिक्कीच्या छत्राखाली स्थापन झालेल्या महिला उद्योजिकांच्या संघटनेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करणाऱ्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते. २०१६ मध्ये शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तत्पूर्वी त्यांनी २००० मध्ये ‘मिलेनियम वर्ल्ड पीस समीट’मध्ये त्यांनी विचार व्यक्त केले होते.