मुंबई विद्यापीठानं प्रसिध्द केलं प्रवेशाचं वेळापत्रक, अशी असेल अ‍ॅडमिशनची प्रक्रिया, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विविध शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्याना आणि पालकांना पुढील उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रापैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अंडर अभ्यासक्रमासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 22 जुलैपासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 22 जुलैपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 ऑगस्ट आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या ट्विटरवर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

मुंबई विद्यापीठाकडून 4, 10 आणि 17 ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्या जातील. तसेच विद्यापीठाच्या कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याना एक अंडरटेकिंग सबमिट करावे लागेल. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या 8411860004 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा.

असा करा ऑनलाइन अर्ज

– सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा

– त्यानंतर होम पेजवरील अॅडमिशन लिंकवर क्लिक करा

– नवीन पेज ओपन झाल्यावर स्वत:ला रजिस्टर करून घ्या

– आता रजिस्टर केलेले नाव आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करा

– अ‍ॅडमिशनच्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा

– त्यानंतर या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा