MPSC : राज्यसेवा झाली आता पुढे काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली की स्पर्धा परिक्षेच्या उमेदवारांना वेध लागतात ते मुख्य परीक्षेचे. पूर्व परीक्षेचा पेपर कसा होता, स्कोर किती आला म्हणत उमेदवार मुख्य परीक्षेविषयी चर्चा करतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर काहींना अवघड तर काहींना सोपा गेला असेल. मात्र कट ऑफ, नवीन मराठा आरक्षणाचा त्यावर होऊ शकणारा परिणाम याविषयात न गुंतता पुढील अभ्यासाची तयारी सुरु केली पाहिजे. निकालाची चिंता न करता विद्यार्थ्यांनी आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत अशी मनाशी गाठ बांधूनच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी.

राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसोबत विद्यार्थ्यांनी इतर एमपीएससी परीक्षांकडेही लक्ष दिले पाहिजे. एमपीएससी २०१९ चे अंदाजित वेळापत्रक आले आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक नेहमी गतिशील ठेवायला हवे. राज्य सेवा आयोगाने PSI, ASO आणि STI या पदांसाठीच्या पुर्व परिक्षा संयुक्त केल्यापासुन विद्यार्थ्यांची संधी कमी झाली आहे. संयुक्त पुर्व परिक्षेसाठी “सामान्य क्षमता चाचणी”चा एक पेपर, पदवी दर्जाच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्नांसाठी १०० गुणांचा असतो. विशेष आव्हानात्मक म्हणजे एक तासांचाच वेळ असतो. त्यामुळे आतापासूनच सर्व घटकांची योग्य तयारी प्रश्नपत्रिकांच्या सरावासहित असणे अपेक्षित आहे. त्यानुसार विदयार्थ्यांनी नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करावी.

एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर (पेपर क्र. १) २८ जुलै

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) ४ ऑगस्ट

राज्य कर निरीक्षक (पेपर क्र. २) ११ ऑगस्ट

सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) २५ ऑगस्ट

सहायक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २८ एप्रिल

सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा १ सप्टेंबर

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा १९ मे

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर

महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा १६ मे

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर (पेपर क्र. १) ६ ऑक्टोबर

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) १३ ऑक्टोबर

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (पेपर क्र. २) २० ऑक्टोबर

कर सहायक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) ४ नोव्हेंबर

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २६ मे

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २६ जून

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी) २ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी/ विद्युत) ९ डिसेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (विद्युत) २४ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य) २४ नोव्हेंबर