‘तीन तलाक’ प्रकरणी लातूरात पहिला गुन्हा दाखल ; ३५ वर्षाच्या छळाला मिळाली वाट

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या ३५ वर्षांपासून शारिरीक, मानसिक छळ केल्यानंतर ५६ वर्षाच्या महिलेला तीनदा तलाक म्हणून तलाक दिल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. याप्रकरणी नूरजहाँ रशिद शेख (वय ५६, रा. पटेलनगर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नूरजहाँ शेख यांचा पती रशिद जानिमियॉ शेख (रा. करीमनगर, लातूर) याने आपल्या पत्नीचा गेल्या ३५ वर्षापासून शारिरीक, मानसिक छळ करुन मारहाण करत असे. त्याने तुझ्या मुलाच्या नावावर केलेले घर आणि दुकानाची जागा माझ्या नावावर कर, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच तुझा व माझा आजपासून काहीच संबंध नाही.

मी तुला तलाक देत आहे, असे म्हणून तलाक… तलाक… तलाक असे तीनदा बोलून बेकायदेशीरपणे तलाक दिला. तसेच नूरजहाँ व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बुधवारी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी रशिद शेख याच्याविरोधात कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, आणि कलम ४ (मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा २०१९) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like