Tina Dutta Viral Kiss Photo | ‘उतरन’मधील इच्छानं चाहत्यांना दिली खुलेआम KISS, व्हायरल झालेल्या फोटोतील क्यूट अंदाज बघून चाहते झाले घायाळ..!
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tina Dutta Viral Kiss Photo | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता (Tina Dutta) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ‘बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) नंतर टिना चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. अलीकडेच ती सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो (Tina Dutta Viral Kiss Photo) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. नुकतंच तिनं शेअर केलेल्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. टिनाचा किस करतानाचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
टिना दत्तानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं इंटरनेटवर चांगलीच आग लावली आहे. तसेच काही फोटोमध्ये तिच्या क्यूटनेसनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. शेअर केलेल्या फोटोमद्ये वेगवेगळ्या हालचाली करत आहे. तर एका फोटोमध्ये तिनं चक्क चाहत्यांना किस (Tina Dutta Viral Kiss Photo) दिली आहे.
टिनानं शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिनं किस केलेला फोटो चाहत्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. तिनं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘कधी कधी वेडं होणं पण गरजेचं आहे. हे अत्यंत रिफ्रेशिंग आहे.’ या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केलाय.
दरम्यान, टिना ‘उतरन’ (Uttaran) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या चर्चेत आली. टिनानं ‘उतरन’ मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कॉमेडी सर्कस (Comedy Circus), बिग बॉस 14, झलक दिखला जा 7 (Jhalak Dikhhla Jaa 7) या मालिकेंमधून चाहत्यांच्या भेटीस आली.
Web Title :- Tina Dutta Viral Kiss Photo | uttaran ichha aka tina datta kissing fans and says it is refreshing see photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | सराईत गुन्हेगार संकेत सुनिल गायकवाड पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार