सावधान ! ‘टिंडर’सह अनेक ‘डेटिंग’ अ‍ॅपवरून ‘लीक’ होतोय तुमचा खासगी ‘डाटा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेटिंग अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. पॉप्युलर डेटिंग अ‍ॅप टिंडर, ग्रिंडर, ओके क्युपिड सारख्या अ‍ॅपच्या यूजर्सचा डाटा धोक्यात आहे. नार्वे कंज्युमर कौन्सिलने दावा केला आहे की या अ‍ॅपवरील यूजर्सची माहिती जाहिरात कंपन्यांबरोबर शेअर केली जात आहे. वृत्तानुसार डेटिंग अ‍ॅपवरील वैयक्तिक माहिती दुसऱ्या कंपन्यांबरोबर शेअर करणं युरोपियन डेटा प्रायव्हसी कायद्याचे उल्लंघन आहे.

नार्वे कंज्युमर कौन्सिल सरकारच्या निधीने चालवली जाणारी एक एनजीओ आहे, त्यांनी सांगितले की ऑनलाइन जाहिरातींचे काम करणाऱ्या कंपन्या स्मार्टफोन यूजर्सच्या प्रोफाइलला ट्रॅक करत आहे. नार्वेच्या या कौन्सिलने एका सायबर सिक्युरिटी कंपनी Mnemonic सह 10 अ‍ॅण्ड्राइड अ‍ॅपचे संशोधन केले. या दरम्यान त्यांना लक्षात आले की हे अ‍ॅप 135 विविध थर्ड पार्टी जाहिरात कंपन्यांशी यूजर्सचा डेटा शेअर करत आहेत.

यावर त्यांनी सांगितले की, हे पूर्णता नियंत्रणांच्या बाहेर आहे. यावर कौन्सिलने युरोपियन रेग्युलेटर्सला कठोर जनरल डेटा प्रायव्हसी रेग्युलेशन कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. वृत्तात सांगण्यात आले की Period tracker अ‍ॅप आणि Virtual makeup app Perfect 365 देखील असेच अ‍ॅप आहेत, जे यूजर्सचा खासगी डाटा जाहिरात कंपन्यांबरोबर शेअर करतात.

फेसबुक पेज लाईक करा –