स्मार्टफोनमधून फोटो चुकून ‘डिलीट’ झाला तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ 3 पध्दतीनं पुन्हा ‘वापस’ मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील तब्बल 4.5 अरब लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे हे स्पष्ट होतं की किमान 4 अरब लोक तर स्मार्टफोनचा वापर करतच असतील. परंतु अनेकांना समस्या येते ती एकदा स्मार्टफोनमधून फोटो डिलिट झाले तर ते पुन्हा परत घेता येत नाहीत. परंतु तीन पद्धती आहेत ज्याने तुम्ही तुमचे फोटो पुन्हा मिळवू शकतात.

गुगल फोटोमधून डिलिट झालेले फोटो कसे मिळवाल –
सर्वांच्या अ‍ॅण्ड्राइड फोनमध्ये गुगल फोटो नावाचे अ‍ॅप असते. त्यात फोटो बॅकअपचाही पर्याय असतो. ज्याच्या मदतीने ते गुगल ड्राइव्हवरुन फोटोंचे बॅकअप घेऊ शकतात. जर यातून फोटो डिलिट झाले तर चिंतेचे काहीही कारण नाही. अ‍ॅप ओपन करा आणि साइज मेन्यूतून Trash किंवा Bin सिलेक्ट करा. त्यात तुम्हाला सर्व डिलिट झालेले फोटो मिळतील. आता तुम्हाला जे फोटो पुन्हा हवे आहेत ते सिलेक्ट करुन रिकवर करा. 60 दिवसांपूर्वी डिलिट केलेले फोटो मात्र यात तुम्हाला मिळणार नाही.

फोन मेमरीतून फोटो डिलिट झाल्यास –
जर तुम्ही तुमच्या अ‍ॅण्ड्राइड फोनमधून किंवा मेमरी कार्डमधून फोटो डिलिट केले असतील तर मेमरी कार्ड काढून ते एखाद्या कार्डरिडर द्वारे कंप्यूटरला लावा आणि कोणत्याही रिकव्हरी सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही हे फोटो परत मिळवू शकतात. कारण डिलिट झालेला डाटा मेमरी कार्डमध्ये तोपर्यंत राहतो जोपर्यंत इतर डाटा कॉफी केला जात नाही. रिकव्हीसाठी तुम्ही कंप्युटरमध्ये EaseUS Data Recovery Wizard डाऊनलोड करु शकतात.

अ‍ॅड्राइड फोनमधून डिलिट फोटो कसे मिळवालं –
यातील रिकव्हरीसाठी तुम्हाला DiskDigger हे अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. याद्वारे डिलिट झालेले व्हिडिओ फोटो परत मिळवता येतात. जर तुम्ही फोटो व्हिडिओपेक्षा काही वेगळे परत रिकव्हर करु इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. असे असेल तरी या द्वारे असेच फोटो रिकव्हर होतात जे करप्ट झालेले नाहीत.