‘टीप-टीप’ बरसा पानीच्या शुटींगदरम्यानचा फराह-कॅटरीनाचा टॉवेलमधील ‘तो’ फोटो ‘सोशल’वर घालतोय धुमाकूळ

मुंबई : वृत्तसंस्था –  बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा सुर्यवंशीच्या शुटींगमध्ये बिजी आहे. रोहित शेट्टीच्या कॉप सीरीजमधील हा चौथा सिनेमा आहे. रोहित शेट्टीचे सिनेमे अ‍ॅक्शनने भरपूर असतात यात शंकाच नाही. या सिनेमाच्या शुटींगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर येताना दिसत आहे.

आतापर्यंत चाहत्यांनी अक्षय कुमारला हेलिकॉप्टरला लटकलेले आणि वेगाने बाईक चालवतानाच्या फोटोत पाहिले आहे. सिनेमातील अ‍ॅक्शन आणि अक्षयचा कॉप लुकमधील अक्षयची वापसी यापेक्षाही चाहत्यांची एक्साईटमेंट कायम ठेवत आहे ते म्हणजे टीप टीप बरसा पानी या गाण्याचं रिमेक. १९९४मध्ये आलेल्या मोहरामधील हे गाणं अक्षय आणि कॅटरीनावर शुट केलं जाणार आहे.

वास्तविक पाहता हे गाणं १९९४मध्ये रिलीज झालं आहे. अक्षय कुमार आणि रवीना टंडनला पावसाच्या पाण्यात रोमांस करताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. अशातच आता कॅटरीना कैफचा नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोत ती फराह खान सोबत दिसत आहे. हा फोटो खुद्द कॅटरीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या फोटोत दिसत आहे की, दोघींनीही पांढऱ्या रंगाचा टॉवेल अंगावर घेतला आहे. कॅटरीनाचे केसही ओले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कॅटरीना म्हणते की, “मी आणि मम्मी मोठ्या कालावधीनंतर एकत्र. लव यू ज बेस्टेस्ट बेस्ट. #Sooryavanshi.” यावरून लक्षात येतं की हा फोटो टीप टीप बरसा पानीच्या रिमेकचा आहे.

https://twitter.com/TheFarahKhan/status/1143811334162866176

याशिवाय फराह खाननेही ट्विट केलं आहे. त्यात फराह खान म्हणतात की, “डार्लिंगं कॅटरीना कैफसोबत… तिचं खरं सैंदर्य हे तिच्या मेकअपमागे आहे. ती नरकाच्या दरवाज्यातून जाऊनही एका परीसारखी सौम्य बनून राहू शकते. मी तिच्यावर खूप प्रेम करते, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब अशी की, मी तिचं कौतुक करते.”

आरोग्यविषयक वृत्त – 

खोबरेल तेल वापरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवा

‘या’ ट्रिक्स फॉलो केल्यास ऑफिसमध्ये तुम्हाला कधीच बोअर होणार नाही

WHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा

फुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे