कमी झोप, जास्त मीठ किडनीसाठी धोकादायक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीरात रक्त शुद्ध करणे, हार्मोन तयार करणे, खनिजे शोषून घेणे, युरिन तयार करणे, विषाक्त तत्त्वे बाहेर काढणे आणि अ‍ॅसिडचे संतुलन ठेवणे हे किडनीचे काम आहे. अनेकांना किडनीच्या आजाराबाबत शेवटच्या टप्प्यात समजते. काही घरगुती उपाय केले तर शरीराचा हा भाग आरोग्यदायी राहू शकतो.

झोप पूर्ण न झाल्यामुळेदेखील किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात. झोपेदरम्यान किडनीच्या पेशीपर्यंत पोहोचणाऱ्या नुकसानीची भरपाई होते. झोप न झाल्यामुळे मेटाबॉलिझमवरदेखील परिणाम होऊन तणाव वाढतो. या तणावामुळे किडनीवर वाईट परिणाम होतो. लघवी थांबवून ठेवणे किडनीसाठी धोकादायक आहे. यामुळे किडनीशी संबंधित समस्या वाढतात. असे सतत झाल्यास किडनी स्टोन किंवा किडनी खराब होऊ शकते. जास्त पाणी पिणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे यूरिन बाहर काढणे गरजेचे आहे म्हणून युरिन थांबवून ठेवू नये.

धूम्रपान किंवा तंबाखू सेवनाने रक्तनलिकेमध्ये रक्तप्रवाह मंदावतो आणि किडनीमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. त्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणून धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करू नये.

पाणी शरीराची गरज असून पाणी कमी प्यायल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. किडनी रक्त शुद्ध करते. विषाक्त पदार्थांना शरीरापासून वेगळे करते. ज्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. पाणी कमी प्यायल्यास विषाक्त तत्त्वे जमा होऊ लागतात. निरोगी व्यक्तीने २-३ लिटर पाणी पिले पाहिजे. अनेकजण जास्त मीठ खातात. जेवताना वरून मीठ घेतात. यामुळे शरीरातील सोडियम वाढते. यामुळे रक्तदाबावर वाढून किडनीवरील दाब वाढतो. हे शरीरासाठी घातक आहे. म्हणून मिठाचे प्रमाण कमीच असावे.