Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  स्मार्टफोनचा सध्या डार्क मोडमध्ये वापर वाढला आहे. यूजर्स बहुतांश अ‍ॅप्लीकेशन्स याच मोडमध्ये वापरू लागले आहेत. डार्क मोड (Dark Mode) दिवसा ठिक आहे मात्र रात्रीच्या वेळी तो नुकसानकारक ठरू शकतो. डार्क मोड (Dark Mode) दिसायला चांगला वाटत असला तरी तुम्हाला कदाचित यामुळे होणारे नुकसान माहित नसेल. या याबाबत जाणून घेवूयात…

Corona Third Wave : नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

कमजोर होईल दृष्टी

जर जास्त कालावधीपर्यंत तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर डार्क मोड वापरत असाल तर तुमचे डोळे त्यालाच अडॉप्ट करतात आणि व्हाईट कलरचे टेक्स्ट वाचणे चांगले वाटते.
परंतु जेव्हा तुम्ही लाईट मोडमध्ये येता, तेव्हा याचा परिणाम डोळ्यांवर होतो, आणि दृष्टी कमजोर होते.
डार्क मोडमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
लाईटमधून डार्क टेक्स्टमध्ये स्विच केल्यानंतर तुमचे डोळे अचानक झालेला बदल अडॉप्ट करू शकत नाहीत.
अशावेळी ब्राईटबर्नची स्थिती सुद्धा दिसू शकते.

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

डोळ्यांना होऊ शकतो हा त्रास

अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशननुसार, डार्क मोड वापरणार्‍या लोकांमध्ये एस्टिगमेटिज्म नावाचा आजार समोर येत आहे.
ज्यामध्ये एका डोळ्याच्या किंवा दोन्ही डोळ्याच्या कॉर्नियाचा आकार काहीसा विचित्र होतो आणि ब्लर दिसू लागते.
ज्यामुळे लोक व्हाईट बॅकग्राऊंडवर ब्लॅक टेक्स्टच्या तुलनेत ब्लॅक बॅकग्राऊंटवर व्हाईट टेस्ट सहजपणे वाचू शकत नाहीत.
डिस्प्ले ब्राईट असल्याने आयरिस छोटा होतो, ज्यामुळे कमी लाईट डोळ्यांमध्ये जाते आणि डार्क डिस्प्लेसोबत उलटा होतो. अशावेळी डोळ्यांच्या फोकसवर परिणाम होतो.

120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस ! ‘या’ कारणामुळे पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ पोलीस तडकाफडकी निलंबित

हे उपाय करा

1 डार्क मोड आणि लाईट मोड दोघांमध्ये अधून-मधून स्विच करत रहा.

2 स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा ब्राईटनेस कमीच ठेवा.

3 दिवसा लाईट मोड वापरा आणि रात्री डार्क मोडचा वापर करा