जाणून घ्या कारचे मायलेज खराब होण्याची कारणे; ज्यामुळे होऊ शकते मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन : आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरात येणाऱ्या गोष्टींपैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली कार. मात्र, अनेक वेळा कारमध्ये मायलेज किंवा जास्त फ्युलच्या वापराची समस्या उद्भवते. पण त्यामागील छुपी कारणे लोकांना माहिती नाहीत. आपण बर्‍याचदा अशी चूक करतो, ज्यामुळे कारमधील फ्युलचा वापर वाढतो. आणि त्यामुळे त्याला वारंवार सर्व्हिसिंग करावी लागते, ज्यामुळे अर्थातच खर्च वाढतो. अशा परिस्थिती जाणून आपल्याकडून होणाऱ्या या चुका ज्यामुळे फ्युलचा खर्च वाढतो.

वारंवार क्लचचा करू नका वापर
ड्राइव्हिंग करताना क्लचचा पुन्हा वापर केल्याने इंधनाचा वापर वाढतो आणि त्याच वेळी क्लच प्लेट्सचे भारी नुकसान होते. म्हणून जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्लचचा वापर करा फक्त इतकेच नाही, ड्राइव्ह दरम्यान अ‍ॅक्सिलेटर पेडल आरामात दाबा, यामुळे तुमच्या वाहनातील इंधनाचा वापर कमी होईल.

लोअर गिअरमध्ये चुकूनही करू नका हे काम
गाडी चालविताना लोअर गिअरमध्ये यावे लागले तर अ‍ॅक्सिलेटर अजिबात दाबू नका कारण असे केल्याने इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज कमी होऊ लागते.

कार सर्व्हिस
वेळेवर कारची सर्व्हिसिंग न करणे हे मायलेज खराब होण्याचे सर्वांत मोठे कारण आहे. वेळेवर सर्व्हिसिंग न केल्याने याचा परिणाम कारच्या इंजिनवर होतो, ज्यामुळे मायलेज कमी होऊ लागते. हेदेखील पाहिले गेले की, लोक स्वस्त सर्व्हिसिंग आणि स्वस्त पार्टस तसेच लुब्रिकेंट वापरतात, जे अत्यंत प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणाहून सर्व्हिसिंग करा.

एअर प्रेशरची घ्या काळजी
जर आपण आपल्या वाहनाच्या टायरमध्ये नियमित हवेचा दाब ठेवला नाही, तर कमी मायलेज होण्याचे हे एक मोठे कारण आहे. आठवड्यातून दोनदा टायर प्रेशर तपासा. असे केल्याने वाहनाचे मायलेज सुधारले जाईल.

जास्त सामान ठेवू नका
लोक त्यांच्या गाडीमध्ये जादा वस्तू ठेवतात, त्यामुळे वाहनाचे वजन वाढते. आणि अशा परिस्थितीत इंजिनला अधिक शक्ती वापरावी लागते, ज्यामुळे इंधनाचा वापरदेखील वाढतो. म्हणून गाडीमध्ये जादा सामान ठेवणे टाळा.