Tips For Asthma Patients | अस्थमाने असाल त्रस्त तर ‘या’ गोष्ठी लक्षात ठेवा, धाप लागण्याच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips For Asthma Patients | अस्थमा (Asthma) म्हणजे दमा हा देखील असाच एक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. हा श्वसनाचा आजार (Respiratory Disease) आहे जो श्वसनलिकेमध्ये एखादा अडथळा निर्माण झाल्यास होतो. हे कफ (Cough) किंवा अ‍ॅलर्जीमुळे (Allergy) असू शकते ज्यामुळे श्वास घेणे खूप कठीण होते. जागतिक महामारी कोरोना (Corona Epidemic) ही समस्या आणखी वाढवू शकते, अशावेळी कोणती काळजी (Tips For Asthma Patients) घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

 

अस्थमा रुग्णांनी या गोष्टी ठेवाव्यात लक्षात (Asthma Patients Should Keep These Things In Mind)
धूम्रपानामुळे (Smoking) फुफ्फुसाचे आजारही (Lung Disease) होतात. किंबहुना, सिगारेटमध्ये असलेले हानिकारक पदार्थ फुफ्फुसाच्या आजाराला जन्म देऊ शकतात, ज्यामुळे दमा होऊ शकतो. अशा स्थितीत धूम्रपानापासून दूर राहावे. याशिवाय प्रदूषणामुळे घाण हवा फुफ्फुसात जाते, त्यामुळे खोकला (Cough) सुरू होतो.

 

त्यामुळे प्रदूषित ठिकाणी (Polluted Place) जाण्यापूर्वी नेहमी मास्क (Mask) वापरा. जास्त व्यायाम (Exercise) करणे टाळा. सततच्या इंटेन्स व्यायामामुळे (Intense Exercise) माणसाला श्वासोच्छवासाचा (Breathing) त्रास होऊ (Tips For Asthma Patients) लागतो.

 

दमा आणि अस्थमामध्ये कोणता फरक आहे?
आयुर्वेदात दमा हा वात आणि कफ दोषांमुळे होतो. यामध्ये, श्वसननलिका (Trachea) संकुचित होते, ज्यामुळे छातीत जडपणा जाणवतो आणि श्वास घेताना शिट्टीचा आवाज येतो.

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अस्थमा हा फुफ्फुसाचा आजार असून त्यामुळे श्वास घेण्यास त्रास (Breathing Problem) होतो. दम्यामध्ये वायुमार्गाला सूज येते ज्यामुळे वायुमार्ग संकुचित होतो.

अस्थमामध्ये काय टाळावे (What To Avoid In Asthma) ?
अस्थामाच्या रुग्णांनी (Asthma Patients) सल्फाईट्स (Sulphites) टाळावेत. हे एक प्रीझर्व्हेटिव्ह (Preservative) आहे जे अल्कोहोल (Alcohol), लोणचे (Pickle), बाटलीबंद लिंबाचा रस (Bottled Lemon Juice) आणि सुकामेवा (Nuts) यासारख्या गोष्टींमध्ये वापरले जाते.

 

याशिवाय, बीन्स (Beans), कोबी (Cabbage), कार्बोनेटेड पेये (Carbonated Drink), कांदा (Onion), लसूण (Garlic) आणि खूप तळलेल्या (Fried Food)
गोष्टींसारखे गॅस तयार करणारे पदार्थ खाणे टाळावे. त्याच वेळी, एका संशोधनानुसार, जे आठवड्यातून 3 वेळा फास्ट फूडचे (Fast Food)
सेवन करतात त्यांना अस्थमाची गंभीर लक्षणे विकसित होण्याचा धोका जास्त असतो.

 

अस्थमाचा कायमस्वरूपी उपचार कोणता (What Is The Permanent Treatment For Asthma) ?
अस्थमावर उपचार करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गाविषयी,
राष्ट्रीय राजधानीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) (एम्स)
च्या पल्मोनोलॉजी आणि स्लीप डिसऑर्डर विभागाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria)
म्हणतात की इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी (आयसीटी) अस्थमा नियंत्रित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

दम्याचे किती प्रकार आहेत (How Many Types Of Asthma) ?
अस्थमाचे अनेक प्रकार आहेत जसे की, अ‍ॅडल्ट ऑनसेट अस्थमा (Adult Onset Asthma),
अ‍ॅलर्जिक ऑक्युपेशनल अस्थमा (Allergic Occupational Asthma), व्यायामाने होणारा अस्थमा,
सीवियर अस्थमा (Severe Asthma) इ. जुन्या अस्थमाचा उपचार सातत्याने औषधे घेवून केला जातो.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Asthma Patients | types of asthma 5 causes of asthma symptoms of asthma in adults hese things shortness of breath can benefit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक

 

White Hair Problem | पांढरे केस होतील पूर्णपणे काळे, महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ‘या’ 2 पानांचा करा वापर

 

Gold-Silver Prices | जागतिक बाजारात दर घसरल्याने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर