डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी, सात सोप्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सातत्याने डिप्रेशन दूर करण्याची औषधी घेतल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. त्याऐवजी घरच्या घरी काही गोष्टींचे पालन केल्यास चांगला आराम मिळू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळा. दररोज पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. यामुळे तरतरी येईल. पुरेशी झोप न घेतल्याने दिवसभर आळसवाणे वाटेल.

अ‍ॅक्टिव्हनेस कायम ठेवा. दररोज वॉकिंग करा. मित्रांसोबत फिरायला जा किंवा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल ती प्रत्येक कामे करा. गाणी ऐकावीत, पिकनिकला जावे. शक्य असेल तर घरामध्ये एखादा कुत्रा किंवा इतर पाळीव प्राणी ठेवा. त्यांच्यासोबत वेळ घालवत डिप्रेशनपासून बचाव करता येईल. यामुळे दिनचर्येमध्येही बदल होईल.  डिप्रेशन दूर करणारी औषधी घेण्याचे टाळा. यामुळे साइड इफेक्ट होण्याची शक्यता वाढते आणि इतर समस्याही होऊ शकतात. कुटुंबासोबत प्रवास करा किंवा धार्मिक स्थळांना भेट द्या. यामुळे दिनचर्या बदलेल आणि तणाव कमी होईल. कुटुंबासोबत गेल्याने नातेही टिकून राहील.

छोटी उद्दिष्टे बनवा व ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे व्यग्र राहाल व ती पूर्ण केल्याने आनंद मिळेल, डिप्रेशनही दूर होईल. मूड बदलण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी आवडता छंद पूर्ण करू शकता. मूड बदलल्यास लक्ष आणि विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/