कर्जाची ‘कटकट’ बंद करायची असेल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, भरण्यासाठी काहीच अडचण नाही येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकाना कर्जाची परतफेड करताना कर्जदारांकडून बर्‍याचदा अशा काही चुका होतात ज्यामुळे लेट पेमेंट चार्ज भरावे लागते. एवढेच नाही तर ईएमआय परत देण्यास उशीर झाल्यास क्रेडिट स्कोरही कमी होते, यामुळे भविष्यात कर्ज मिळणे अवघड होते. आज आम्ही आपल्याला लेट पेमेंट चार्ज आणि डीफॉल्ट टाळण्याचे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण कर्जापासून मुक्त होऊ शकाल आणि ईएमआय भरण्यास कोणतीही अडचण होणार नाही.

संकटांशी सामना करण्यासाठी इमर्जन्सी फंड ठेवा –

ईएमआय वेळेवर भरण्यासाठी काही रक्कम आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड ) म्हणून बचत करुन ठेवली पाहिजे. हा फंड तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी मदत करू शकेल. जर तुमच्या आयुष्यात काही वाईट घडलं, जसे की तुमची नोकरी सुटली किंवा तुम्ही आजारी पडलात तर हा फंड तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. यामुळे कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही.

कमी व्याज दर आकारणार्‍या कर्जदात्याकडे जा –

ईएमआय भरताना जास्त ओढाताण होऊ नये अडचणी येऊ नये म्हणून कमी व्याज दर आकारणार्‍या कर्जदात्याकडून कर्ज घ्यावे. शिल्लक हस्तांतरणाद्वारे दुसर्‍या कर्जदात्याकडे जाणे हा आपला कर्जाचा ईएमआयचे ओझे कमी करण्याचा एक मार्ग असू शकतो.

कर्जाची मुदत वाढवा –

आपण वेळेवर ईएमआय भरण्यास सक्षम नसल्यास आणि या कारणास्तव आपणास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यास आपण आपल्या चालू कर्जदात्यास कर्जाची मुदत वाढविण्याची विनंती करू शकता. असे केल्याने आपल्याला रक्कम भरण्यास अधिक वेळ मिळेल. आपल्याकडे देय देण्यासाठी अधिक वेळ असल्यास आपण डीफॉल्ट होण्याची शक्यता टाळता. मात्र जर आपण कर्जाची मुदत वाढविली तर त्यासाठी आपल्याला अधिक व्याज देखील द्यावे लागेल.

जास्त कर्ज घेण्यास टाळा –

जर आपण आधीच कर्ज घेतले असेल परंतु अधिक पैशांची गरज असेल तरीही आपण जास्त कर्ज घेणे टाळले पाहिजे. असे बरेच लोक आहेत ज्यांनी आधीच कर्ज घेतले आहे परंतु आवश्यक असल्यास पुन्हा कर्ज घेतात. आपण अशी परिस्थिती टाळली पाहिजे. यासाठी आपण नेहमी इमर्जन्सी फंड आपल्याकडे ठेवला पाहिजे.

एकापेक्षा जास्त कर्ज एकत्रित करा

आपल्याकडे बरीच कर्ज असल्यास आपण ती एकत्रित करू शकता. असे केल्याने आपण केवळ एक ईएमआय तयार करा त्यामुळे पुन्हा पुन्हा ईएमआय देण्याची चिंता राहणार नाही.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like