Tips For Pink Lips | ओठांचा काळेपणा दूर करायचा आहे?; तर करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर रंग-रंगोटी करत असतात. (Tips For Pink Lips) त्यामधील सर्वात आवडता पार्ट म्हणजे लिपस्टिक (Lipstick) आहे. परंतू या लिपस्टिक्समुळे ओठांची नैसर्गिक ब्युटी निघुन जाते. काही वेळेस ओठ काळेही होतात. (Tips For Pink Lips) यामुळे आज आम्ही तुम्हाला ओठांचा काळेपणा कसा दूर करायचा हे सांगणार आहोत.

 

आपल्या सर्वांना तिळाचं तेल माहिती असेल. याच तिळाच्या तेलामध्ये कोण-कोणते पदार्थ मिक्स करायचे, जेणे करून तुम्ही तुमचे ओठ गुलाबी करू शकता. तर जाणून घेऊयात. (Tips For Pink Lips)

 

1. खोबरेल तेल (Coconut Oil)
नारळ आणि तिळाचे तेल (Sesame oil) ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. अर्धा चमचा खोबरेल तेल आणि अर्धा चमचा तिळाचे तेल घ्या. त्यानंतर ते दोन्ही चांगले मिसळा. याने ओठांना पाच मिनिटे मसाज करा. 30 मिनिटे असेच राहू द्या. काही दिवसांनी हळुहळू ओठांचा काळेपणा निघून जाईल.

 

2. साखर (Sugar)
साखरेसोबत तिळाचे तेल मिक्स करा. एक छोटा चमचा साखर घ्या आणि हलकी चुरा. आता अर्धा चमचा तिळाचे तेल घेऊन त्यात साखर मिसळून त्याचे स्क्रब (Scrub) बनवा. स्क्रब तयार झाल्यावर ते ओठांवर लावा आणि बोटांच्या मदतीने तीन ते चार मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने ओठ धुवून टाका.

3. हळद (Turmeric)
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हळद आणि तिळाचे तेलही तुम्ही वापरू शकता.
यासाठी अर्धा चमचा तिळाचे तेल घ्या आणि त्यात दोन चिमूटभर हळद मिसळा.
ही पेस्ट ओठांवर लावा आणि दोन मिनिटे मसाज करा. अर्ध्या तासानंतर तसंच राहू द्या, मग स्वच्छ पाण्याने धुवा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Pink Lips | sesame oil for pink lip care tips mix coconut turmeric and sugar for remove dark lips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

 

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं