SBI नं दिला इशारा, चुकून देखील ‘या’ चुका करू नका अन्यथा अकाऊंट होईल ‘रिकामं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारडून देशात डिजिटल देवाणघेवाणीला चालना दिली जात आहे. 2021 पर्यंत ही देवाणघेवाण चार टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बँकेने देखील सुरक्षेच्या संबंधित अनेक पावले उचलायला सुरुवात केली आहे. फ्रॉड संबंधी बँकेकडून वारंवार सुचना दिल्या जात आहेत. सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या जयपूर व्यवस्थापनाने ग्राहकांना इमेलद्वारे अलर्ट जारी केला आहे.

या गोष्टींची घ्या काळजी
एसबीआयने ग्राहकांना सावध केले आहे की, लॉटरी लिंकली, गिफ्ट, नोकरी किंवा स्वस्तात वस्तू देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मेसेज किंवा इमेलला कधीही गांभीर्याने घेऊ नका.

तुमच्या खात्याची माहिती किंवा एटीएमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत शेअर करू नका याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

आमची बँक किंवा आमचा कोणताही प्रतिनिधी ग्राहकांना एटीएम पिन, इंटरनेट पासवर्ड, वन टाईम पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर यासारखी वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी कधीही ई-मेल, एसएमएस, टेलिफोनचा वापर करत नाही.

आपण अशा ऑफरची माहिती, गुन्हेगारास पकडण्यासाठी घडलेल्या घटनांचा तपशील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून जवळच्या एसबीआय शाखेला कळवू शकता.

शाखेशी संपर्क साधण्यासाठी गुगल सर्च इंजिनवर उपलब्ध असलेल्या तपशीलांवर भरोसा ठेवू नका. यासाठी केवळ अधिकृत एसबीआय वेबसाइटचा वापर करा असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

पिन आणि पासवर्ड गुप्त ठेवा आणि वेळेवर तो बदलत रहा.

फ्रॉड केवळ ऑनलाइन व्यवहारामध्ये नाही तर एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे देखील केली जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना सावधानी बाळगायची गरज आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like