तुमच्या UPI ‘पीन’नं देखील होऊ शकतो ‘फ्रॉड’, फसवणूकीपासुन वाचण्यासाठी ‘या’ 6 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारत सरकार देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. सन २०२१ पर्यंत देशात डिजिटल व्यवहार चारपट वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. भारतात अनेक लोक डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय म्हणजेच यूनिफाईड पेमेंट इन्टरफेसचा वापर करत आहेत. युपीआयद्वारे महिन्याला कोट्यवधीचे व्यवहार होतात. परंतु, प्रश्न हा आहे की, युपीआय किती सुरक्षित आहे? युपीआयमुळे ग्राहकांचा फायदा होत असला तरी धोकेही आहे.

देशात तंत्रज्ञान वाढत असताना ऑनलाईन फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. हॅकर्स सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. रोज सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये लोकांच्या खात्यातील लाखो रूपये गायब होत आहेत. यासाठी सुरक्षित व्यवहार करण्यासाठी काही खास टीप्स आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

कुणालाही देऊ नका युपीआय पिन
तुमचा युपीआय पिन हा एटीएम पिनसारखाच असतो. यासाठी तो कुणालाही देऊ नका. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

येथेच करा युपीआय पिनचा वापर
काही अ‍ॅप्लीकेशन तुमची वैयक्तिक माहिती मोबाईल फोनमधून चोरतात. यामध्ये आर्थिक व्यवहारांची माहिती सुद्धा असते. तुम्हाला अशा अ‍ॅपपासून सावध राहीले पाहिजे. तुमचा युपीआय पिन सुरक्षित ठेवला पाहिजे. कारण यामुळे फसवणूक होऊ शकते. सावधगिरी म्हणून भीम युपीआय सारख्या सुरक्षित अ‍ॅपचाच वापर करा. जर कोणत्याही वेबसाईटच्या फॉर्ममध्ये युपीआय पिन टाकण्यासाठी लिंक दिली असेल तर सावध रहा.

केवळ पैसे पाठविण्यासाठी युपीआय पिन टाका
आर्थिक व्यवहार करताना एक गोष्टी लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्हाला कुणाला पैसे पाठवायचे आहेत तेव्हाच पिन मागितला जातो. जर तुम्हाला कुठून पैसे मिळणार असतील आणि त्यासाठी युपीआय पिन मागितला जात असेल तर येथे तुमची फसवणूक होऊ शकते.

अशाप्रकारे करा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क
जर आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला कोणती अडचण आली तर ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. यासाठी पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचाच वापर करा. इंटरनेटवर उपलब्ध फोन नंबरवर कॉल करून माहिती देऊ नका.

युपीआय काय आहे.
युपीआय अंतर बँक ट्रान्सफर सुविधा आहे, ज्याद्वारे स्मार्टफोनवर फोन नंबर आणि आयडीच्या मदतीने पेमेंट करता येते. हे इंटरनेट बँक फंड ट्रान्सफर मकॅनिजमवर आधारित आहे.

युपीआय असे काम करते
एनपीसीआयद्वारा ही सिस्टम नियंत्रित केली जाते. यूजर्स यूपीआयद्वारे काही मिनिटात घर बसल्या पैसे पाठवू शकतात, तसेच पैसे मिळवू शकतात.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/