तोंडाच्या दुर्गंधामुळं लोक तुमच्यापासून दूर पळतात ? जाणून घ्या कारणं अन् ‘हे’ 3 सोपे उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकजण श्वासांच्या किंवा तोंडाच्या दुर्गंधामुळं परेशान असतात. आज आपण याची कारणं आणि यासाठी काही खास घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

काय आहेत कारणं ?

– काहीही खाल्ल्यानंतर लगेच चूळ न भरणं
– दातांची स्वच्छता न करणं
– तोंडाची स्वच्छता न करणं

महत्त्वाचं काही –

तुमच्या तोंडातील लाळ ही तोंडाला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज दातांच्या रोगांपासून बचाव करतात. जर तोंडातून येणाऱ्या दुर्गंधाची तुम्हाला लाज वाटत असेल तर दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. जेवणाच्या 10 मिनिट आधी आणि जेवण झाल्यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्यायला विसरू नका. यामुळं तुमची पचनक्रिया देखील सुधारते आणि ओरल हेल्थही चांगली राहते.

तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी उपाय –

1) शुगर फ्री कँडी – तोंडाचा वास येऊ नये यासाठी शुगर फ्री कँडी किंवा च्विंगम खा. यामुळं दातांचा आणि तोंडाचा व्यायाम होतोच सोबतच तोंडाचा दुर्गंध कमी होतो. याशिवाय गालांचा आकारही चांगला राहतो.

2) साखर, मीठ आणि मद्यपान – गरजेपक्षा जास्त चहा-कॉफीचं सेवन केलं तर तोंडाचा वास येण्याची शक्यता असते. यासाठी आहारात साखरेचं प्रमाणही कमी ठेवा. याशिवाय मद्यापानामुळंही तोंडाचा भयंकर वास येतो.

3) दिवसातून 2 वेळा ब्रश करा –

श्वासांचा आणि तोंडाचा दुर्गंध दूर करायचा असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी असा 2 वेळा ब्रश करावा. यामुळं अनेक तास तोंडाचा दुर्गंध येणार नाही. नाष्ता केल्यानंतर किंवा दिवसभरात काहीही खाल्ल्यानंतर लगेच चूळ भरण्याची सवय असू द्या. याशिवाय तोंडाचा वास येऊ द्यायचा नसेल तर आहारात गाजर आणि ओव्याचा समावेश असू द्या. वेळोवेळी दातांची तपासणी करा आणि त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष असू द्या.