’या’ 8 टिप्सनं डायबिटीस नियंत्रणात ठेवा, ब्लड शुगर वाढण्याचं टेंशन होईल दूर

डायबिटीस नियंत्रणात ठेवणं खुप अवघड असतं. तसेच उष्ण हवामाना(Hot weather)त तर ही हे आणखी कठीण ठरतं. कारण उष्ण हवामाना (Hot weather) मुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो आणि रुग्णांना विविध आरोग्य समस्या सतावू लागतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्याने डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो, ते जाणून घेवूयात…

हे उपाय करा

1 व्यायाम करा
दररोज व्यायाम करा. किंवा किमान दर दीड तासानंतर जागेवरून उठून चाला. तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2 ताण तणाव
काळजी, ताण यामुळे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढू शकते. यापासून दूर राहा. तणाव वाढल्यास कार्टिसोल हॉर्मोन्सची निर्मिती वाढते आणि इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आयाने रक्तातील साखर अचानक वाढते. यासाठी तणावमुक्त राहा.

3 तुळस
अँटिऑक्सिडंट गुण असलेल्या तुळशीची दोन ते तीन पाने रिकाम्या पोटी रोज खा किंवा एक चमचा तुळशीचा रस प्या. यामुळे साखरेची पातळी कमी होते.

4 फायबरयुक्त आहार
आहार भाकरी, कडधान्य यांचा समावेश करा. यामुळे साखरेचं प्रमाण वाढणार नाही.

5 हायड्रेट रहा
डायबिटीस रुग्णांना ब्लड शुगर जास्त असल्याने डिहायड्रेशनचा धोका जास्त वाढतो. यासाठी उन्हाळ्यात 2 ते 3 लिटर पाणी प्या. आहारात पातळ डाळ, नारळपाणी, सूप घ्या.

6 उन्हात जास्त जाऊ नका
उष्ण हवामानात डायबिटीस रुग्णांनी जास्त जाऊ नये. त्वचेचा एलर्जी होऊ शकते. उन्हापासून लांब राहा.

7 डोळ्यांची तपासणी
डायबिटीक लोकांना डोळ्यांचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्याने डोळ्यांची तपासणी करा.

8 ज्यूस प्या
मधुमेह कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारल्याचं ज्यूस घ्या आणि ते एकत्र करून प्या. या ज्यूसचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा.