‘गॅस’ पास होण्याची समस्या आहे का ? करा ‘हे’ महत्त्वाचे 7 उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक लोक असे आहेत ज्यांना जेवल्यानंतर गॅस पास होण्याची समस्या उद्भवत असते. आज आपण गॅस पास होण्याच्या समस्येवरील काही उपाय जाणून घेणार आहोत.

1) सावकाश खा – शरीरातील जास्तीत जास्त गॅस हा हवेमुळं तयार होतो. म्हणून घाईत जेवण करू नये. सावकाश खाऊन ही समस्या कमी होते. एखादं काम करताना किंवा बोलताना काही खाऊ नका यामुळं गॅस तयार होतो.

2) गॅस तयार करत असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा -ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फ्रुक्टोज आणि लॅक्टोज जास्त असतात त्यांमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत गॅस तयार करणारे घटकही जास्त असतात. यासाठीच स्प्राऊट्स, ब्रोकोली, सोडा, कार्बोनेड सोडा, बटाटा, गहू, कांदा, साबुदाणा अशा पदार्थांचं सेवन कमी करा.

3) च्युईंगम चावणं टाळा – काहींना च्युईंगमची खूप सवय असते. यामुळं जास्तीत जास्त हवा तोंडावाटे आत घेतली जाते. यामुळंही गॅस पास होण्याची समस्या येते.

4) मादक पदार्थांचं सेवन टाळा -सिगारेट किंवा ई सिगारेट शरीरासाठी खूप घातक आहे. यामुळंही पोट फुगणं आणि गॅस अशा समस्या येतात.

5) शारीरिक हालचालींमध्ये वाढ -शरीराची पुरेशी हालचाल झाली नाही तर पोट बिघडून गॅस पास होतो. म्हणून शारीरिक हालचाल वाढवा. यामुळं पचनक्रियाही व्यवस्थित राहते.

6) कोल्डड्रीक्सचं सेवन करणं टाळावं – थंडपेयांमध्ये दबावात हवा भरलेली असते. याशिवाय यातील सोड्यामुळंही गॅस निघत असतो. यामुळं याच्या सेवनानं गॅस पास होतो.

7) पाण्याचं सेवन – पाणी कमी प्यायल्यानं किंवा जेवल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्यानंही पोट फुगून पोटात गॅस तयार होतो. त्यामुळं असं काही करणं टाळा.