कामाची गोष्ट ! करोडपती बनायचंय मग ‘नो-टेन्शन’, फक्त ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकाचे  करोडपती  होण्याचे स्वप्न असते परंतु  ठराविक लोकांनाच ते प्रत्यक्षात साकार करता येते. त्यासाठी  सात गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा  आपले  करोडपती होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. कमाई कमी आणि खर्च जास्त असल्यावर महिन्याच्या शेवटी  उसने पैसे घेण्याची वेळ येते. जाणून घ्या करोडपती होण्यासाठी कोणत्या  गोष्टींची खास काळजी घ्यावी –

1) वेळेवर गुंतवणूक सुरू करा –

तरुण लोक  वेळेत गुंतवणूकीचा विचार करीत नाहीत आणि यामुळे मौल्यवान वेळ निघून जातो. जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितक्या परतावा (रिटर्न) मिळण्याची शक्यता जास्त असते.  तरूणांच्या आर्थिक जबाबदाऱ्या कमी असतात, जर त्यांनी विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना पॉलिसीचा प्रीमियम भरण्याबरोबरच त्यांचे आवश्यक खर्च भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

2 ) वेळोवेळी आढावा घ्या –

आपण कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर वेळोवेळी त्याचा आढावा घ्या. आपण नियमित आढावा घेतला नाही तर आपल्या पैशावर आपल्याला पाहिजे तितके परतावा मिळणार नाही. आपल्याला परतावा, जोखीम, किंमत इत्यादींचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे.

3) पगाराच्या 70% खर्च करा, 30% वाचवा

सल्लागारांचे म्हणणे आहे की व्यक्तीने त्याच्या  त्यांच्या पगारापैकी 70% खर्च करावा.सणासुदीच्याकाळात  कोणी अधिक खरेदी केली असेल आणि घराचे बजेट कोलमडले असेल तर काळजी करण्याचे  कारण राहणार नाही. आपण बचत करण्यासाठी जमा केलेले पैसे काढून आपले बजेट कोलमडण्यापासून वाचवू शकता.

 4) वेगवान परतावा देणारे पर्याय निवडा –

जर आपण फक्त एफडी किंवा पीपीएफसारख्या पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला त्याच प्रकारचा परतावा देखील मिळेल. परंतु आपण एका प्रकारच्या गुंतवणूकीच्या पर्यायांमधून वेगवान परतावा देणारे पर्याय निवडा. जर तुम्ही एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा होईल.

5) जोखीम घेण्यास घाबरू नका –

आपला स्वतःचा व्यवसाय असल्यास जोखीम घेण्याची चिंता करू नका. कधीकधी जोखीम न घेणे धोकादायक असते. म्हणूनच योग्य परीक्षण करूनच पैशांची गुंतवणूक करा.

6) खर्चावर नियंत्रण –

आधुनिक जीवनशैलीचे अनुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाही प्रसंगी कर्जही घेतले जाते.  अशा सवयी टाळा. अनावश्यक खर्चासाठी कधीही कर्ज घेऊ नका.

7) संपूर्ण माहिती घेतल्यानंतर गुंतवणूक करा –

बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करतात त्यामुळे  त्यांना नुकसान सहन करावे लागते. आपण माहितीअभावी नकळत असे पैसे खर्च करीत असाल तर गुंतवणूकीचा हा योग्य मार्ग नाही.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like