Tips To Beat summer Heat | कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips To Beat Summer Heat | उत्तर भारतात पडणार्‍या उष्णतेमुळे (Summer Season) सर्वांचे जगणे कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडताच कडक उन्हात घाम फुटतो. यामुळे आजारी देखील पडू शकता. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उन्हापासून दूर राहू शकता. उन्हाळ्यात स्वत:चे संरक्षण कसे करावे ते जाणून घेवूया. (Tips To Beat Summer Heat)

 

1. तोंड आणि डोके उन्हापासून ठेवा सुरक्षित (Protect Mouth And Head From The Sun)

घराबाहेर पडताना तोंड आणि डोके सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे. कारण जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या तोंडावर आणि डोक्यावर पडतो तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुमचा चेहरा काळवंडू शकतो, टॅनिंग होऊ शकते. दुसरीकडे सूर्यप्रकाश डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

 

2. जास्त पाणी पित रहा (Drink Water In Summer Season Alway)

याशिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून वेळोवेळी पाणी पीत रहा. बहुतेक लोक उन्हाळ्यात पाणी पितात, परंतु तरीही त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 

3. सुती आणि आरामदायक कपडे घाला (Wear Cotton And Comfortable Clothing In Summer)

उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत, कारण असे न केल्यास तुम्हाला खूप उष्णता जाणवेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.

 

4. उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा (Use Sunscreen Before Outing)

तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन लोशन लावा, जेणेकरून तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. यामुळे तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही. (Tips To Beat summer Heat)

 

5. फळांचा ज्यूस पीत रहा (Drinking Fruit Juice)

फळांचा ज्यूस जास्त प्या. ज्यूस प्यायल्याने पोषक तत्वे मिळतात. यामुळे शरीर ताजेतवाने वाटते.
उन्हाळ्यात फळांचा रस प्यायल्याने जास्त फायदा होतो. कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे शरीर थंड राहते.

 

Web Title :- Tips To Beat summer Heat | tips to beat summer heat drink water wear cotton clothes safe form low blood pressure and dehydration

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा