Tips to Get Rid of Mucus | सर्दीनंतर छातीत साठला असेल कफ तर ‘या’ 4 पद्धतीने मिळवा आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips to Get Rid of Mucus | हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, खोकला आणि सर्दी होणे खूप सामान्य आहे. थंडीच्या हंगामात हा त्रास इतर दिवसांच्या तुलनेत थोडा जास्तच वाढतो. त्यानंतर छातीत कफ जमा होण्याची समस्या खूप त्रास देते. यामुळे अनेकवेळा लोकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो. (Tips to Get Rid of Mucus)

 

यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या औषधांचा आधार घेतात, पण तरीही यापासून सहज सुटका होत नाही. अशा स्थितीत कफपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसणार नाहीत.

 

कफच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही किफायतशीर आणि प्रभावी घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. त्याबद्दल जाणून घेऊया. (Tips to Get Rid of Mucus)

 

1. मिठाच्या पाण्याने करा गुळण्या
छातीतील गुळण्या बाहेर पडण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यासाठी कोमट पाण्यात थोडेसे मीठ मिसळा आणि दिवसातून दोन-तीन वेळा गुळण्या करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

2. कच्ची हळद वापरा
कफ दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा वापर करू शकता. यासाठी कच्च्या हळदीचा रस काढून काही थेंब घशात टाका आणि काही वेळ शांत बसा. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्यात हळदीचा रस मिसळून गुळण्या करू शकता.

 

3. गूळ आणि आले
गूळ आणि आले कफची समस्या दूर करण्यात खूप मदत करू शकतात. यासाठी आले सोलून भाजून घ्या. नंतर ते कुस्करून त्यात गूळ मिसळून गोळी बनवून दिवसातून दोनदा सेवन करा.

 

4. मध आणि काळी मिरी
मध आणि काळी मिरी तुम्हाला तुमच्या छातीतील कफ काढून टाकण्यास मदत करेल. यासोबतच घशातील दुखण्यापासून आराम देण्याचे काम करेल.
यासाठी काळी मिरी बारीक करून बारीक पावडर बनवा. यानंतर त्यात थोडे मध मिसळून सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips to Get Rid of Mucus | how to get rid of phlegm or mucus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breastfeeding Nutrition Food | बाळाला देत असाल स्तनपान तर आहारात करा ‘या’ महत्वाच्या फूड्सचा समावेश

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?