Holi 2021 : ‘कोरोना’मध्ये खेळा सुरक्षित होळी, फॉलो करा ‘या’ टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   होळी हा रंगांचा, आनंदाचा, प्रेम वाटण्याचा सण आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून घरी भेटीही केल्या जातात. यंदा 28 आणि 29 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. पण कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने पुन्हा एकदा सर्वांनाच चिंताग्रस्त केले आहे. अशा परिस्थितीत होळी खेळणे किती सुरक्षित असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान काही गोष्टींची काळजी घेत आपण सुरक्षित होळी खेळू शकतो.

–  होळी खेळण्यासाठी अधिकाधिक लोकांच्या गटात सामील होऊ नका.

–  छोटे गट करुन होळी खेळा.

–  मिठी मारणे किंवा हात मिळविण्यापासून दूर रहा.

–  होळी खेळताना संपूर्ण स्वच्छतेची काळजी घ्या.

–  आजारी लोकांपासून अंतर ठेवा.

–  60% -95% अल्कोहोल सामग्रीसह हँड सॅनिटायझर वापरुन, साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात स्वच्छ करा.

–  डोळे, नाक किंवा तोंडावर हात ठेवू नका.

–  हात घाण झाल्याबरोबर लगेच धुवा.

–  शौचालयातून आल्यानंतर, खाण्यापूर्वी आणि खोकला, शिंका येणे किंवा नाक वाहताना हात स्वच्छ करणे महत्वाचे आहे.