Tips To Prevent Cancer | कॅन्सरसारखा जिवघेणा आजार टाळण्यासाठी नवीन वर्षात सुरू करा हे काम, नेहमी रहाल टेन्शन फ्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips To Prevent Cancer | कॅन्सरला बहुतांश आपणच जबाबदार असतो. कॅन्सरला कलंक मानले आणि या आजारावर चर्चा करण्यास टाळले जाते ते यापेक्षा सुद्धा धोकादायक आहे. खरे तर, कॅन्सरसाठी जीन्स, जीवनशैली आणि पर्यावरण हे प्रामुख्याने कारणीभूत आहे. पर्यावरणीय कारणांमुळे होणारा कर्करोग टाळण्यासाठी सामूहिक जबाबदारी आवश्यक आहे. परंतु जीवनशैलीशी संबंधित कारणे आपण स्वतः टाळू शकतो (Tips To Prevent Cancer).

 

कॅन्सरपासून बचाव करण्याच्या टिप्स (5 Cancer Prevention Tips)

१. नियमित तपासणी करा (Get Regular Checkups)
कॅन्सरची सुरुवातीची चिन्हे समजणे कठीण असल्याने, नियमित कॅन्सर तपासणी करणे हा एक अतिशय स्मार्ट निर्णय आहे. ब्रेस्ट, सव्र्हिकल, कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रिनिंगने खूप आधी ओळखता येऊ शकतो.

 

२. व्हॅक्सीनेशन (Vaccination)
महिलांमध्ये सर्विकल कॅन्सरसाठी मानवी पॅपिलोमाव्हायरस जबाबदार आहे. यासाठी लहान वयातच ही लस घेतल्यास सर्विकल कॅन्सर कधीच होणार नाही. हिपॅटायटीस बी लसीकरणामुळे लिव्हरच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

३. सुरक्षित लैंगिक संबंध (Safe Sexual Relations)
ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे सर्विकल आणि घशाचा कर्करोग होतो. यामुळे टॉन्सिल आणि जिभेवरही संसर्ग होऊ शकतो. हा व्हायरस असुरक्षित लैंगिक संबंधातूनही पसरू शकतो. म्हणूनच सुरक्षित संबंध ठेवल्याने अनेक प्रकारचे कॅन्सर टाळता येतात. हिपॅटायटीस बी आणि सी सुरक्षित लैंगिक संबंधांमुळे देखील कॅन्सर टाळता येऊ शकतात. जर हिपॅटायटीसचा आजार नसेल तर लिव्हरच्या कॅन्सरचा धोका खूप कमी होतो.

 

४. नियमित एक्सरसाईज (Regular Exercise)
४५ मिनिटांपासून ते १ तासापर्यंतचा नियमित व्यायाम केवळ कॅन्सरच नाही तर इतर अनेक आजारांपासून वाचवतो.
नियमित व्यायामाने बीएमआय म्हणजेच लठ्ठपणा वाढणार नाही आणि लठ्ठपणा वाढला नाही तर शरीर आपोआपच अनेक आजारांपासून आपले संरक्षण करेल. म्हणूनच रोज व्यायाम करा. व्यायामासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी धावणे, चालणे, पोहणे, सायकल चालवणे योग्य आहे.

 

५. हेल्दी डाएट (Healthy Diet)
निसर्गाने ऋतूमध्ये ज्या प्रकारची फळे आणि भाज्या दिल्या आहेत, त्यांचेच सेवन करा.
अन हेल्दी डाएटपासून दूर राहा. म्हणजे जास्त चरबीयुक्त अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त मीठ
खूप गोड पदार्थ खाऊ नका. दररोज विविध फळे आणि भाज्यांचे सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips To Prevent Cancer | health lifestyle changes can prevent from cancer expert reveal tips to get rid of carcinogenesis diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!