जेवणानंतर एक चमचा मध खा, पोटाच्या समस्या करा दूर

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक जण बऱ्याचदा चवदार अन्नपदार्थ असल्यास अधिक खातात. परंतु नंतर यामुळे पोटात जळजळ, सूज येणे, वेदना होणे आणि पित्ताचा त्रास होतो. आपण आपल्या भुकेपेक्षा थोडे कमी खाल्ले पाहिजे. परंतु असे करूनही काही वेळा या समस्येचा सामना करावा लागतो. जर आपल्यालादेखील या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर काही घरगुती उपाय करून आपण यावर उपचार करू शकतो.

१) मध
अ‍ॅटी-ऑक्सिडंट आणि औषधी गुणधर्मयुक्त मध रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतो. यामुळे पोट फुगणे पचन क्रिया ठीक न होणे या समस्या दूर होऊन पचनक्रिया मजबूत होते. आपण दिवसातून तीन वेळा एक चमचा मधाचे सेवन केले पाहिजे.

२) हिरवी विलायची
विलायचीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जेवणानंतर एक-दोन हिरव्या विलायचीचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे पोटात जडपणा वाटत नाही तसेच पोट फुगणे किंवा तोंडातून दुर्गंधी येत नाही.

३) बडीशेप आणि साखर कँडी
ज्या लोकांना पोट फुगणे व पोटात जडपणा वाटणे ही समस्या असेल, त्यांनी जेवणानंतर ताबडतोब बडीशोप आणि साखर कँडीचे सेवन करावे. यामुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि तोंडाचा वास दूर होतो.

४) जवसाची बियाणे
जवसाच्या बियाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे पाचन तंत्राला मजबूत करून पोटाच्या समस्यांवर मात करण्यास मदत करते. जेवणानंतर जवसाच्या बियांचे सेवन केल्यास अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो.