मान आणि छातीचा काळेपणा घरगुती नॅचरल क्लींझर, टोनर आणि नेक स्क्रबने करा स्वच्छ; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य मिळवणे सोपे असते. मात्र, यासाठी जेव्हा तुम्ही गुगल सर्च करता तेव्हा असंख्य पर्याय समोर येतात, ज्यामुळे डोके चक्रावून जाते. जर तुम्हीसुद्धा चेहरा सुंदर बनवण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधून थकला असाल, तर आम्ही तुम्हाला असे नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे मान आणि काळी पडलेली छाती उजळू शकते. यासाठी नॅचरल क्लींझर, टोनर आणि स्क्रब कसे तयार करावे ते जाणून घेऊयात…

नॅचरल क्लींझर

नॅचरल क्लींझरने चेहर्‍यावरील घाण स्वच्छ करणे योग्य आहे. हे कसे तयार करावे ते जाणून घेऊयात.

कृती : 3 ग्लास पाणी, 1 मूठ जव, लिंबू तेलाचे पाच थेंब घ्या. एका पातेल्यात 3 कप पाणी आणि 1 मूठ जव टाका. हे कमी आचेवर उकळवा आणि जेव्हा उकळेल तेव्हा ते गॅसवरून हटवा, गाळून घ्या आणि कंटेनर भरा. यामध्ये लिंबू तेलाचे पाच थेंब टाका आणि वापरण्यापूर्वी चांगले हलवून घ्या. मानेच्या आजूबाजूला वापरताना सूती, नरम कपड्याचा वापर करा.

रिस्ट्रोटिव्ह टॉनिक

या टॉनिकने त्वचा ताजी आणि कोलेजन, इलास्टिनचे उत्पादन करून मजबूत ठेवते. हे बनवण्याची कृती जाणून घेऊयात.

कृती : सलाडची 3 पाने, 3 मोठे चमचे मध, अर्ध्या लिंबाचा रस घ्या. प्रथम सलाडच्या पानांना वाटून त्याचा रस काढून घ्या. नंतर मध आणि लिंबू रसासोबत मिश्रण तयार करा. मान आणि छातीच्या जवळपास मिश्रण लावा आणि 20 मिनिटांसाठी सोडून द्या. 20 मिनिटांनंतर हे स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

सुरकुत्या हटवण्यासाठी एलोवेरा क्रीम

यासाठी एलोवेराची 2 पाने घ्या. 1 मोठा चमचा मध, 1 अंड्याचा सफेद भाग, ओव्याची ताजी पाने घ्या. प्रथम एलोवेराचा गर काढून घ्या आणि मिक्सरध्ये इतर वस्तूंसह बारीक करा. हे मिश्रण मान आणि जवळच्या भागावर हळूहळू पातळ थराप्रमाणे लावा. 20 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

एलोवेरा लोशन

हे बनवण्यासाठी 1 कप कॅमोमाइल चहा, 100 मिलिलिटर रोजवॉटर, चंदन तेलाची 2 थेब, हे साहित्य घ्या. प्रथम एक कप गरम पाण्यात दोन मोठे चमचे कॅमोमाइल टाका आणि चांगले मिश्रण तयार करा. एयरटाइट कंटेनरमध्ये चहाला गुलाब जल आणि चंदन तेलासह मिसळा आणि वापरण्यापूवी हलवून घ्या. कॉटन लोशनमध्ये बुडवून हळूहळू मान आणि छातीवर रगडा. असे केल्याने काही दिवसांत काळी मान आणि छाती स्वच्छ होईल.

नेक स्क्रब

त्वचेवर जाम मृत पेशींना हटवण्यासाठी सर्वांत प्रभावी उत्पादनांपैकी एक आहे स्क्रब आणि जर यामुळे हटल्या नाहीत, तर यामुळे काळे डाग बनू शकतात. हा नैसर्गिक उपाय त्वचेला कसॅली आणि मॉयस्चराइज करतो आणि पोषण देतो.

कृती : 1 मोठा चमचा मध, 2 बदाम, अर्धा चमचा लिंबू रस हे साहित्य घ्या. प्रथम मध, बदाम आणि बारीक वाटलेल्या लिंबूसह मिश्रण तयार करा. ज्या भागावर लावायचे आहे तो स्वच्छ करू घ्या. हे नैसर्गिक क्लीनर, घाण दूर करण्यासाठी एकदम योग्य आहे.