आरोग्यताज्या बातम्या

Tips to Remove Body Weakness | नेहमी कमजोरी जाणवते का? एनर्जीसाठी ‘या’ 6 गोष्टींची घ्या मदत; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips to Remove Body Weakness | आजच्या जीवनशैलीत शरीरातील (Body) अशक्तपणा (Weakness) ची समस्या केवळ वृद्धांनाच सतावत नाही. तर, तरुणांनाही अनेकदा शरीरात कमजोरीची समस्या भेडसावते, ज्याची अनेक कारणे (Reason) असू शकतात. यामध्ये जास्त परिश्रम करणे, पुरेसे आवश्यक न्यूट्रिएंट्स (Nutrients) आणि पाणी न घेणे, धूम्रपान (Smoking) आणि कॅफिनची (Caffeine) सवय असणे अशा अनेक कारणांचा समावशे आहे. (Tips to Remove Body Weakness)

 

शरीरातील अशक्तपणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी लोक सर्व प्रकारची औषधे (Medicine) आणि टॉनिकची (Tonics) मदत घेतात. परंतु स्वयंपाकघरात असलेल्या 5 गोष्टींद्वारे तुम्ही शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवून कमजोरी दूर (how to increase energy level) करू शकता. या 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

 

अशक्तपणा कसा दूर करावा? (How to get rid to weakness)

1. अंडी खा (Eat Eggs)
शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी रोज अंडी खाऊ शकता.

 

2. चीज खा (Eat cheese)
जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही चीज, स्प्राउट्स आणि बीन्स सारख्या गोष्टींचीही मदत घेऊ शकता. हे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत ज्यात मॅग्नेशियमची चांगली मात्रा असते आणि ते शरीराला ऊर्जा देतात. (Tips to Remove Body Weakness)

 

3. ओटमील सर्वोत्तम (Oatmeal)
शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही रोज ओटमील (Oatmeal) खाऊ शकता. जर तुम्ही ते दूधासोबत घेतले तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेडही खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात कार्ब्स मिळतील, ज्यामुळे अशक्तपणा लवकर दूर होईल.

 

4. केळी खा (Banana)
शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, आहारात कोणत्याही स्वरूपात केळीचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला हवे असल्यास केळीचा शेक बनवूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. केळीमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी लवकर वाढवण्यास मदत करतात.

 

5. ड्रायफ्रुट्स-बिया (Dry fruits-Seeds)
शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ड्रायफ्रूट्स आणि बियांचा समावेश करावा.
यासाठी तुम्ही बदाम, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, चिया सीड आणि फ्लेक्सचे सेवन करू शकता.
यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतील आणि अशक्तपणा दूर होईल.

 

6. पुरेसे पाणी प्या (Drink Enough Water)
पुरेशा प्रमाणात पाणी न पिल्यानेही तुमच्या शरीरात कमजोरी जाणवू शकते.
त्यामुळे पाणी प्या, ते तुम्हाला डिहायड्रेशनपासून (Dehydration) वाचवण्यास मदत करेल.
तुम्हाला हवे असल्यास अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी (Green Tea) किंवा ब्लॅक टीचे (Black Tea) सेवन करू शकता.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Tips to Remove Body Weakness | remove weakness of body with these things

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button