रंग खेळून झाले का ?, आता रंग जात नसेल तर करा ‘हे’ उपाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – धुलिवंदन, होळी आणि रंगपंचमी हे रंगांनी नटलेले सण. सर्वच जण हे सण मोठ्या उत्साहाने खेळतात. त्यात रंगात कोणकोणते केमिकल्स वापरले जातात हे कोणाला माहित नसते आणि आपण मोकाटपणे हे रंग वापरतो. अशा काही रंगामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे रंग खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

परंतू अनेकदा रासायनिक रंग वापरल्याने हा रंग आपल्यासाठी घातक ठरू शकतो. हा रंग त्वेचेच्या आत पर्यंत जातो. त्यामुळे हा रंग लवकर निघतही नाही. तर तो काढण्यासाठी नेमके काय उपाय करावेत, हा प्रश्न सर्वांसमोर असतो.

त्वचेवरील रंग काढण्याच्या काही टिप्स
१.
धुलिवंदन खेळून आल्यावर आपण अंघोळ करणे निवडतो. मात्र आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर न करता थंड पाण्याचा वापर करावा. त्याने त्वचेचा रंग लवकर निघेल.

२. लिंबाचा रस आणि मध सम प्रमाणात एकत्र करून रंग असलेल्या ठिकाणी चोळा त्याने रंग निघण्यास मदत होईल.

३. हळद, बेसन, दही आणि ऑलिव्ह ऑइल या नैसर्गिक घटकांचा फेस पॅक बनवून तो धुलिवंदन खेळून आल्यावर चेहऱ्यावर लावा.

४. पपईची पेस्ट, मुलतानी माती आणि मध यांचा देखील फेसपॅक बनवून तो रंग लागलेल्या ठिकाणी लावी.

५. एखाद्या अँटीसेप्टिक क्रिमने रंग असलेल्या जागी मसाज करा.

६. शक्य असल्यास रंग काढण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा.

रंग खेळण्यापूर्वीच त्वचेची काळजी कसी घ्यावी

१. घरातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण त्वचेला वॉटरप्रुफ सनस्क्रीन लावावे. जेणेकरून, सुर्याच्या किरणांपासून तुमचे संरक्षण होईल.

२. रंग विकत घेताना ते नैसर्गिक आणि त्वचेला हानी पोहचवणारे नसतील, हे पाहूनच खरेदी करावेत.

३.
संपूर्ण अंगावर मॉईश्चर किंवा तेल जास्त प्रमाणात चोपडून घ्यावे. त्यामुळे रंग अंगाला चिटकून बसणार नाहीत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us