जर तुम्हालाही झोपेच्या आधी मोबाईल वापरण्याची आहे सवय तर व्हा सावध, गंभीर आहेत परिणाम; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन : आजकाल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात इंटरनेटचा प्रवेश वाढल्यापासून तो आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. कामासाठी असो किंवा वेळ मिळाला तरी लोकांनी त्यांचा दिवसाचा अधिक वेळ स्मार्टफोनसह घालवायला सुरुवात केली आहे. परंतु स्मार्टफोनचा हा वाढता वापर धोकादायक देखील आहे. हे केवळ आपल्या डोळ्यांनाच प्रभावित करत नाही तर शरीराच्या इतर भागालाही नुकसान करते. जाणून घेऊया रात्री झोपेच्या आधी स्मार्टफोन युज करण्याचे परिणाम…

डोळे होऊ शकतात खराब
सहसा लोक त्यांच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ब्राईटनेस एकदम फुल ठेवतात. स्मार्टफोनच्या ब्रायटन्समुळे आणि फोनचा सतत वापर यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. फोनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश थेट डोळ्यातील पडद्यावर परिणाम करतो, ज्यामुळे डोळे लवकर खराब होऊ लागतात. इतकेच नाही तर हळूहळू पाहण्याची क्षमताही कमी होऊ लागते आणि डोकेदुखी वाढू लागते.

डोळे ड्राय होण्याची तक्रार
दिवसभर काम केल्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळत नाही, त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही स्मार्टफोन वापरला तर तुमचे डोळे ड्राय होऊ लागतात तसेच सूज येण्याची तक्रार देखील सुरु होते. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ झाल्याच्या तक्रारी देखील आहेत आणि डोळ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

डोकेदुखी
स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे डोळ्यातून पाणी येऊ लागते. मोबाईलमधून निघणारी किरणे डोळ्यांसाठी खूप हानीकारक असल्याचे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे. स्मार्टफोनचा सतत वापर केल्याने पापण्यांच्या हालचालींची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे डोळ्याची बुबुळ आणि नसाही संकुचित होऊ लागतात, ज्यामुळे डोकेदुखी वाढते.