पाकिस्तानमध्ये ‘या’ ठिकाणी फडकला तिरंगा, ‘असा’ साजरा करण्यात आला स्वातंत्रदिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या ७३ व्या स्वातंत्र दिनाच्या दिवशी काल देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी भारताला जागतिक स्तरावरून देखील मोठ्या प्रमाणात अनेक देशांनी शुभेच्छा दिल्या. इजरायल आणि रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्रांनी भारताला या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक राष्ट्रांत देखील भारताचा हा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. भारतासह चीन, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांत भारतीयांनी तिरंगा फडकावत भारताचा स्वतंत्रदिन उत्साहात साजरा केला.
त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये भारताचा तिरंगा फडकविण्यात आला.

पाकिस्तानमधील इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात भारताचा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेथे असलेले भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांनी झेंडावंदन केले. त्यावेळी मोठ्या संख्येने भारतीय उपस्थित होते. काश्मीरच्या मुद्द्यावर चिडलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पुन्हा भारतात परतण्यास संगितले होते. त्याचबरोबर दोन्ही देशांतील व्यापार देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे अजय बिसारिया यांच्या अनुपस्थितीत गौरव अहलूवालिया यांनी झेंडावंदन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात लहानमुले देखील उपस्थित होती.

दरम्यान, याचबरोबर अन्य देशांतील दूतावासांमध्ये देखील भारताचा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुबईमधील भारतीय दूतावासात मोठ्या जल्लोषात भारताचा ध्वज फडकविण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –