Nashik : मामाच्या नात्याला काळीमा फासणार्‍या 2 घटना, पहिल्यामध्ये पिडीतेने संपवले जीवन तर दुसर्‍यात मुलगी दहशतीखाली

नाशिक : ऑनलाइन टीम – महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक शहरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुणीने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले तर दुसऱ्या घटनेतील तरुणी दहशतीखाली आहे. नाशिक शहरातील घडलेल्या दोन घटनांमध्ये एका पीडितेला सख्ख्या मामाने आपल्या वासनेचा बळी केले. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीसोबत मामाने शेतात रात्रीच्या अंधारात लैंगिकत अत्याचार केल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. पाथर्डी शिवारात घडलेल्या घटनेत मामाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडितेने आपले आयुष्यच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात घडलेल्या या दोन्ही घटना मामाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या आहेत.

एकलहरेजवळी एका गावात अल्पवयीन भाचीवर तिच्या मामाने अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामा विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अगरटाकळी येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या मामाच्या गावाला गेली होती. त्यावेळी तिच्या चुलत मामाने रात्री नऊच्या सुमारास तू गावात आली मला भेटली नाही, तू मझ्या सोबत चल… असे म्हणत मुलीला फुस लावून तिचा हात पकडला. तसेच तिचे तोंड दाबून बळजबरीने घरामागील मळ्यातील जुन्या घरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करु लागला. मुलीने विरोध करताच तिला मारहाण करुन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.

यानंतर आरोपीने पीडित मुलीला घेऊन गावात आणून सोडले. तेथे पुन्हा आरोपी रविंद्र याने दमदाटी करुन पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर त्याने घराला बाहेरुन कुलूप लावून निघून गेला. मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्याने ति कोणालाही संपर्क साधू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने फोन केल्यावर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आजी-आई, मामा यांनी तातडीने आरोपी रविंद्र याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मुलीची सुटका केली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित रविंद्रच्या विरुद्ध बलात्कार व पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना पाथर्डी शिवारात घडली असून संशयित आरोपीने भाचीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत बळजबरीने शरीरसबंध ठेवले. अखेर मामाच्या त्रासाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मामा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने शुक्रवारी (दि.7) पाथर्डी शिवारातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आरोपीने मुलीला आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खोटे सांगून तिला रुमवर घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितले तर आई वडिलांना मारुन टाकेल अशी धमकी दिली होती. असे पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.