Homeताज्या बातम्याTirupati Devasthan Trust | 'मातोश्री'वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना 'कॉल'; 'तिरुपती...

Tirupati Devasthan Trust | ‘मातोश्री’वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना ‘कॉल’; ‘तिरुपती ट्रस्ट’च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था –  Tirupati Devasthan Trust | देशातील सर्वाधिक श्रींमत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या (Tirupati Devasthan Trust) नव्या बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने यासाठी ट्रस्टच्या नव्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यांमध्ये एकूण 28 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचीही ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

सर्वाधिक प्रतिष्ठित म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाची (Tirupati Devasthan Trust) ख्याती आहे.
या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते.
मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस. जगनमोहन रेड्डी (CM Y. S. Jaganmohan Reddy) यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या नावाची शिफारस केली आहे.
त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत.
नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या
मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील आहे.
गतवर्षी त्यांची निवड करण्यात आली होती. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे.

 

Web Title : Tirupati Devasthan Trust | shivsena uddhav thackeray pa milind narvekar in new tirumala tirupati devasthanam board

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

Pune Fire News | पुण्यातील कंपनीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता; आग नियंत्रणात (व्हिडीओ)

NSC | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ ‘स्कीम’द्वारे मिळवा टॅक्स बेनिफिट आणि चांगला व्याजदर, जाणून घ्या पूर्ण माहिती 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News