भक्ताला पॉर्न लिंक पाठवणे पडले महागात, ‘त्या’ कर्मचार्‍याला तिरुपती देवस्थानने केले बडतर्फ

तिरुपती : वृत्तसंस्था – हैद्राबादमधील एका भक्ताला धार्मिक सामग्री पाठवण्याऐवजी पॉर्न क्लिप ((Porn Clip) पाठवणा-या एका कर्मचा-याला तिरुपती देवस्थानने (Tirupati Devasthanam) बडतर्फ केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कर्मचारी हा श्री. व्यंकटेश भक्ती चॅनेलमध्ये काम करत होता. त्याने हैदराबादमधील एका भक्ताला पॉर्न लिंक पाठवली होती. त्याने ही लिंक अधिकृत वेबसाइटच्या ईमेलद्वारे पाठवली होती. ही लिंक आल्यानंतर भक्ताने टीटीडीतल्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. तपासात तो दोषी आढळल्यावर त्याच्या विरोधात ही कारवाई केली आहे.

30 कर्मचारी पाहत होते पॉर्न साईटस
टीटीडी अधिकाऱ्यांकडे ही तक्रार आल्यानंतर ते चाटच पडले. मंदिर प्रशासनाने तपासणी केल्यानंतर धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. मंदिरातील एकूण 30 कर्मचारी नेहमी पॉर्न पाहत असल्याचे तपासात आढळले. हा खुलासा तपासासाठी बोलावलेल्या आयटी तज्ञ्ज्ञांनी केला आहे. हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत पॉर्न पाहत होते ही चकीत करणारी गोष्ट आहे. तसेच हे कर्मचारी इतरही आक्षेपार्ह साइट्स पाहत असत. तपास पथकाने कार्यालयातील सर्व कॉम्प्यूटर सील केले. कारवाईसाठी तपासाचा अहवाल टीटीडी व्यवस्थापनाकडे पाठवला आहे. तपासात दोषी सिद्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.

तेव्हा विसर्जित केले होते बोर्ड
याच वर्षी जानेवारी महिन्यात नेते बनलेले अभिनेते पृथ्वीराज यांनी SVBC चा अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी चॅनलच्या एका महिला कर्मचाऱ्यासशी आक्षेपार्ह बोलल्याचे व्हिडिओत दिसत होते. या प्रकरणानंतर मंदिर प्रशासनाने SVBC बोर्ड विसर्जित केले होते आणि ए. व्ही. धर्मा रेड्डी यांची चॅनेलच्या व्यवस्थापकीच संचालकपदी नियुक्ती केली होती.