जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात लॉकडाउननंतर पहिल्यांदाच एका दिवसात मिळाली 1 कोटी रुपयांची देणगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लॉकडाउन झाल्यानंतर पहिल्यांदाच, तिरुपती बालाजी मंदिरात गेल्या शनिवारी एका दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त रुपये दान मिळाले आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड -19 च्या संकटाच्या काळात सर्वप्रथम भाविकांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तथापि, मंदिर 11 जून रोजी यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडले आहे.

मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये एका दिवसात प्रथमच 1 कोटींची देणगी मिळाली आहे. टीटीडीने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी 13,486 भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आणि दान केलेल्या प्रसादाची मोजणी केली गेली.

तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. देशातील सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिराला सर्वाधिक रोख, दागिने आणि इतर देणग्या मिळतात. या मंदिरात महिन्यात 200 कोटींपेक्षा जास्त देणगी मिळते. 20 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर मंदिर बंद झाल्यामुळे देणगी बंद होती. दरमहा 200 कोटींपेक्षा जास्त मिळणार्‍या मंदिरात एक रुपयाही दान करण्यात आला नाही.

लॉकडाऊन झाल्यानंतर 10 जून रोजी प्रथमच मंदिर उघडले गेले आणि पहिल्याच दिवशी 25 लाख रुपयांहून अधिक दान झाले. तिरुमला तिरूपित देवस्थानम ट्रस्टच्या मते, लॉकडाउन झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले होते.