रत्नागिरी : अतिवृष्टीमुळं चिपळूणचे तिवरे धरण फुटलं ; ६ जणांचा मृत्यू तर १७ जण अद्यापही बेपत्‍ता

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या चार दिवसापासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळं रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली असून त्यामुळं ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्यापही १७ जण बेपत्‍ता आहेत. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, ६ मृतदेह हाती लागले आहेत़ या धरणाची क्षमता जवळपास १ टीएमसी आहे.

धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. पाऊस वाढला तर हे धरण फुटले असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.
या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे.

तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्यापही १७ जण बेपत्‍ता आहेत.

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ