TMC नेते पोहचले निवडणूक आयोगात; BJP नेत्यांवर कट रचल्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत भाजपा आणि टीएमसी सतत एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, टीएमसीच्या एका शिष्टमंडळाने ममता बॅनर्जी यांच्यावरील कथिल हल्ल्याबद्धल दिल्लीतील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. टीएमसी नेत्यांनी निवडणूक आयोगास यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यास सांगितले. पक्षाने पुम्हा एकदा हे षडयंत्र म्हंटले आहे. टीएमसी व्यतिरिक्त भाजपा नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.

भाजपा नेत्यावर आरोप
टीएमसी नेते आल्यावर निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हेदेखील उपस्थित होते. टीएमसी नेत्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यापूर्वी भाजपा नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून धमकी दिली होती. त्यात पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांचेही नाव लिहले होते. ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की, दिलीप घोष यांनी हल्ल्याच्या आधी फेबुकावर एक पोस्टमध्ये ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये आल्यावर त्या पडतील असे म्हंटले होते.

याशिवाय टीएमसी नेत्यांनी हल्ल्याच्या अगोदर निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, भाजप नेत्यांनी पश्चिम बंगालचे डीजीपी आणि आयजीपी यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी राज्य सरकारशी न बोलता निवडणूक आयोगाने डीजीपी हटवण्याचा निर्णय घेतला.

पोलीस कट रचुन गायब झाले
टीएमसी नेत्यांनीही भाजपा खासदार सौमित्र दास यांनी केलेल्या षडयंत्राचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये ते बाबुवा सुप्रियोला प्रत्युत्तर देत आहेत. टीएमसी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्विटमध्ये दास सांगत आहेत की, ‘उद्या संध्याकळी ५ नंतर तुम्हाला कळेल’. हे षडयंत्र असल्याचे यातून स्पष्ट झाल्याचे टीएमसी नेत्यांनी सांगितले. याशिवाय टीएमसी नेत्यांनी पुन्हा सांगितले की, हमल्याच्या वेळी एसपी आणि लोकल पोलिसांना गायब करण्यात आले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममधील निवडणूक प्रचार संपल्यानंतर अचानक दुखापत झाली. दुखापतीनंतर ममता यांनी दावा केला की, काही लोकांनी त्यांना गाडीच्या दिशेने ढकलले.