तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहां लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ते २१ जून दरम्यान नुसरत जहां लग्नगाठ बांधणार आहे. नुसरत तु्र्कीमध्ये डेस्टीनेशन वेडिंग करणार आहे. नुसरत जहां कोलकात्यामधील बिजनेसमन निखिल जैन सोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. आता लवकरच हे लवकपल विवाहबद्ध होत आहे. दोन आठवड्यांपूर्वीचच नुसरत त्यांच्या नात्याविषयी सोशलवर जाहीर केलं होतं. पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून नुसरत विजयी झाल्या होत्या.

या दिवशी मेहंदी आणि संगीत
नुसरतच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याचं दिसत आहे. तिच्या कोलकात्यामधील घराबाहेर विद्युत रोषणाई केली आहे. बोडरममध्ये नुसरत यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जूनला हा सोहळा रंगणार आहे. नुसरत १६ जून रोजी आपल्या परिवारासह तुर्कीला रवाना होणार आहेत.


खासदार मिमी चक्रवर्ती यांचीही उपस्थिती
जेव्हा नुसरतचं लग्न आहे तेव्हा त्याच कालावधीत लोकसभेचं अधिवेशन सुरु असेल. नुसरतच्या लग्नसोहळ्यास त्यांची खास मैत्रीण आणि तृणमूल खासदार मिमी चक्रवर्ती उपस्थित असणार आहेत. याशिवाय टॉलिवूडमधील अनेक कलाकारही या विवाहसोहळ्यास हजर राहू शकतात. विवाहबद्ध झाल्यानंतर नुसरत यांचं मायदेशीही रिसेप्शन असणार आहे.

अशी झाली नुसरत आणि निखील यांची भेट
गेल्या वर्षीच दुर्गा पूजेदरम्यान निखिल आणि नुसरत यांची भेट झाली होती. नुसरत एका साडीच्या जाहिरातीचं शुटींग करत होत्या तिथेच यांची ओळख झाली. नंतर याचं रुपांतर मैत्रीत झालं आणि दोघेही पुढे प्रेमात पडले. आता जवळपास एक वर्ष होत आलं असेल हे दोघेही आता लग्नागाठ बांधणार आहेत.

नुसरत जहां यांच्या वर्कफ्रंटबद्दल थोडक्यात…
नुसरत जहां यांनी बंगाली सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत स्वत:ची जागा तयार केली आहे. अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या नुसरत यांनी शोत्रु या सिनेमातून सिनेजगतात पाऊल टाकलं. २०११ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. खोका ४२०, जमाई ४२०, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्प्रप्रेस अशा सिनेमात नुसरत यांनी काम केलं आहे.

आरोग्य विषयक वृत्त
‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

You might also like