अभिनेत्री व खासदार नुसरत जहॉं यांनी शेअर केला विना मेकअप फोटो आणि….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नवीन खासदार नुसरत जहॉं यांचे उद्यागेपती निखिल जैन यांच्याबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्न झाले आहे. त्या लग्न झाल्यानंतर महिनाभरातच संसदेत पोहचल्या.

नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दोघी तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेच्या आवारात जीन्समध्ये दाखल झाल्या त्यावरून दोघींना ट्रोल केलं गेलं होतं.

त्या संसदेत पोहचल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. नवीन नवरीच्या वेषात नुसरत जहॉं यांनी संसदेत पाऊल टाकले. नुसरत यांनी भांगात सिंदूर भरलेला होता आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलेले होते. यानंतर त्यांची सोशल मिडियावर खूप चर्चा झाली.

नुसरत जहाँ बंगालमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी निखिल जैनबरोबर नुकतंच लग्न झालं.

लग्नानंतर आणि खासदार झाल्यानंतर नुसरत जहॉं सोशल मिडियाच्या स्टार झाल्या पण त्यांचे सोशलवर अक्टिव्ह होणे कमी झाले. खूप दिवसानंतर रविवारी सकाळी नुसरत जहॉं यांनी एक फोटो शेअर केले होता. आपल्या चाहत्यांना फोटोद्वारे ‘हॅपी संडे’ शुभेच्छा ही दिल्या.

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. त्या पहिल्यांदा संसदेत दाखल झाल्या त्या नवविवाहितेच्या आभूषणांसह.

त्याचबरोबर तिने फोटोखाली नो मेकअप, नो फिल्टर असे देखील लिहले होते. त्यांच्या या फोटोला हजारो चाहत्यांनी लाइक आणि कमेंट केले आहे. या आधीदेखील सोशल मिडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांनी टर्कीला डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्याचीही बरीच चर्चा झाली.

अभिनेत्री व खा. नुसरत जहॉं यांच्या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नाचे देखील फोटो सामील आहेत. त्यांचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात. त्या आधी सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असायच्या आणि आपले सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर करत असे.

यापूर्वीही नुसरत यांचे काही फोटो सोशल मीडियावर असेच गाजले होते. त्यात त्यांच्या लग्नविधींच्या फोटोंचा समावेश होता.

त्यांचे सोशल मिडियावरचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस पडतात. चाहते त्यांच्या फोटोला लाइक आणि कमेंट करत असतात. खासदार झाल्यापासून नुसरत जहॉं सोशल मिडियावर फार कमी दिसून येतात.

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

लग्न झाल्यावर आणि त्यानंतर खासदार झाल्यानंतर संसदेत पाऊल टाकल्यावर त्यांनी बजेट सेशनमध्ये भाषण केले. नुसरत जहॉं आणि मिमि चक्रवर्ती या दोन्ही बंगाली अभिनेत्री पहिल्यापासूनच संसदेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

तृणमूल काँग्रेसकडून नुसरतनी निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर लगेचच लग्नाची धामधूम झाली.

२५ जुनला खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्यानंतर नुसरत जहॉं यांनी शपथ घेतल्यानंतर ‘वंदे मातरम्’ असेही म्हटले होते. नुसरत जहॉं आणि मिमि चक्रवर्ती या दोघी कॉंग्रेसच्या खासदार आहेत. संसदेच्या आवारात जीन्स घालून आल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्रोल केले होते. त्यांच्या फोटोंना युजर्सने ट्रोल केले होते.

संसदेच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आणि TMC च्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्याबरोबर जोडीने नुसरत या वेषभूषेत दिसल्या.