पश्चिम बंगालच्या ‘या’ खासदार नुसरत जहाँ पेक्षा नाहीत कमी सुंदरतेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासदार नुसरत जहाँ यांच्यासमवेत आणखी एक बंगाली अभिनेत्री संसदेत आली. नुसरत जहांचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, दुसऱ्या खासदार मिमी चक्रवर्ती देखील काही कमी सुंदर नाहीत. तृणमूल कॉंग्रेसच्या जागेवरुन निवडणूक जिंकल्यानंतर त्या बंगालच्या जादवपूर येथून संसदेत पोहोचलया आहेत. मिमी सोशल मीडियावरही त्यांचे सुंदर फोटो पोस्ट करतात, यावर फॅन्स अनेकदा कमेंट करतात. तर मग पाहूया मीमी चक्रवर्ती यांची काही उत्तम छायाचित्रे.

बंगाल मधील जलपाईगुडी येथील रहिवासी असलेल्या मिमी बंगाली चित्रपटांच्या अभिनेत्री आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर, बऱ्याचदा त्यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल करण्यात आले. संसदेच्या पहिल्या दिवशी काही जणांनी त्यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 30 वर्षीय मिमी चक्रवर्ती यांनी बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापूर्वी मॉडेलिंगही केले होते. मिमी यांनी फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता.

गेल्या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त खासदार नुसरत जहा यांच्यासह त्यांनी केलेले नृत्यही खूप व्हायरल झाले होते. ज्यासाठी लोकांनी नुसरत जहां यांनाही ट्रोल केले. मिमी चक्रवर्ती पांढऱ्या साडी आणि दुर्गापूजेसाठी तयार सोन्याच्या दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –